होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन तेलवाहू जहाजांवर भीषण हल्ला दोन भारतीय खलाशी बेपत्ता, भारताकडून तीव्र निषेध

होर्मुझच्या सामुद्रधुनी परिसरात दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांचा भारताने निषेध केला आहे. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या या हल्ल्यांमध्ये दोन भारतीय खलाशी बेपत्ता झाले आहेत. (missing) त्यांच्या शोधासाठी बचावकार्य सुरू असून, भारताचे मस्कत दूतावास ओमानच्या प्रशासनाशी समन्वय साधत आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘एमटी पेट्रो डॉल्फिन’ या जहाजावर ड्रोन हल्ला झाल्याचे वृत्त आहे. या जहाजावरील ११ भारतीय खलाशांपैकी दोन जण बेपत्ता असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले.केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एमटी पेट्रो डॉल्फिन’ या तेलवाहू जहाजावर सोहर अँकरेज येथे ड्रोन हल्ला झाला. जहाजावरील नऊ भारतीय खलाशांची सुटका करण्यात आली असून ते सुरक्षित आहेत. (missing) उर्वरित दोन भारतीयांचा शोध घेण्यासाठी स्थानिक तटरक्षक दलाकडून शोध आणि बचावकार्य सुरू आहे. सोनोवाल यांनी सांगितले की, बेपत्ता खलाशांना शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत आहे.

‘एमटी व्हॅलथेरा’ या मार्शल आयलंड्सचा ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजावरही अज्ञात प्रक्षेपकाने हल्ला केला. या हल्ल्यानंतर जहाजावर आग लागली. मात्र, जहाजावरील सर्व ११ भारतीय खलाशी सुरक्षित असल्याची माहिती भारताने दिली आहे.व्यापारी जहाजांवरील वारंवार होणारे हल्ले चिंताजनक असून, (missing) त्यामुळे आधीच तणावपूर्ण असलेली परिस्थिती आणखी बिघडण्याचा धोका असल्याचे भारताने म्हटले आहे. भारतीय खलाशांची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.जागतिक पातळीवरील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने राजनैतिक आणि संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करत सागरी मार्गांवरील वाहतूक सुरक्षित राहावी आणि व्यापारी जहाजे, खलाशी तसेच नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ले थांबवणे गरजेचे असल्याचे भारताने आपल्या भूमिकेतून अधोरेखित केले आहे.

हेही वाचा : 

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी आडवा,पाणी जिरवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

नापास झालेल्या कंगना रणौतची राहुल गांधींवर टीका, नवा वाद पेटणार

कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी तत्काळ करा