आगामी काही काळात कर्नाटक, तेलंगाना आणि आंध्र प्रदेशमधून नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या राज्यातून खरीप हंगामातील कांदा लवकरच बाजरात येण्याची शक्यता आहे.

अल निनोमुळे शेती संकटात आलीय. त्याचा परिणाम काहीसा घाऊक आणि किरकोळ बाजारावर पडतोय. सध्या बाजारात कांद्याचा भाव चांगलाच वाढलाय. गेल्या वर्षाच्या तुलनेत कांद्याचा भाव थेट दुप्पट झालाय. या महागाईमुळे सामान्यांचं कंबरडं मोडतं की काय अशी स्थिती आहे. (onions) दरम्यान, आता सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आगामी काळात कांद्याचा भाव कमी होऊ शकतो. विशेष म्हणजे जगभरातील कांद्याचा भाव कमी होण्यात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
सध्या कांद्याचा भाव किती हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार आगामी काळात कांद्याचा भाव कमी होण्याची शक्यता आहे. 10 ऑक्टोबर रोजी देशात कांद्याचा किरकोळ बजारातील भाव 52.99 रुपये प्रती किलो आहे. गेल्या वर्षी याच काळात हा भाव 26.65 रुपये प्रती किलो होता. (onions) म्हणजेच एका वर्षाच्या तुलनेत कांद्याचा भाव साधारण 99 टक्क्यांनी वाढलाय. सरकारी आकड्यानुसार 10 सप्टेंबर रोजी कांद्याचा सरासरी किरकोळ भाव 53.10 रुपये होता. हाच भाव 10 ऑक्टोबर रोजी 52.99 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला. म्हणजेच घाऊक बाजारात कांद्यााच भाव कमी होणार असल्याचे बोलले जात असले तरी किरकोळ बाजारात मात्र कांद्याचा भाव अद्याप कमी झालेला पाहायला मिळत नाहीये.
घाऊक बाजारात कांद्याचा सरासरी भाव 4,591 रुपये प्रति क्विंटल आहे. गेल्या महिन्यात हा भाव 2.4 टक्के जास्त आहे. गेल्या वर्षभराच्या तुलनेत हा भाव तब्बल 123.3 टक्क्यांनी जास्त आहे. (onions) दरम्यान, आगामी काही काळात कर्नाटक, तेलंगाना आणि आंध्र प्रदेशमधून नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या राज्यातून खरीप हंगामातील कांदा लवकरच बाजरात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सरकारनेही कांद्याचा भाव कमी व्हावा यासाठी पाऊल उचलण्यास सुरुवात केलीय. सरकारने आपल्या बफर स्टॉककमधून कांद्याची विक्री करण्यास सुरुवात केलीय. हा कांदा बाजारत आल्यास भाव कमी होऊ शकतो. आवक वाढल्याने बाजारावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी आडवा,पाणी जिरवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
नापास झालेल्या कंगना रणौतची राहुल गांधींवर टीका, नवा वाद पेटणार