दिल्लीतील मोर्चात विदेशी ताकदी, आंतरराष्ट्रीय कट, एकनाथ शिंदे यांचे खळबळजनक विधान

दिल्लीतील मोर्चावर एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली. कालचा दिवस काळा दिवस असल्याचे त्यांनी म्हटले. सुप्रीम कोर्टावर चाल करून जाण, दबाव आणण अशी कधीही न घडलेली घटना घडली. राहुल गांधी आणि इंडिया आघाडी यांचा निषेध करतो, असे त्यांनी म्हटले.

काल दिल्लीत थेट कोर्टावर मोर्चा काढण्यात आला. इंडिया आघाडीकडून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आणि इंडिया आघाडीचे खासदार मोर्चात सहभागी होते. दिल्ली सीजेपीचे कार्यकर्ते असतानाच इंडिया आघाडी आक्रमक होताना दिसत आहे. नुकताच या आंदोलनावर भाष्य एकनाथ शिंदे यांनी केले. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, कालचा दिवस हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस होता. बाबासाहेबांनी जे संविधान दिल… संविधानिक संस्था उभ्या केल्या. सुप्रीम कोर्टावर चाल करून जाण, दबाव आणण अशी कधीही न घडलेली घटना घडली. राहुल गांधी आणि इंडिया आघाडी यांचा निषेध करतो. निषेध करावा तेवढा थोडा होईल. लोकशाहीत त्यांना अधिकार आहे. (criticized) याचिका दाखल करायला मोर्चा घेऊन जाण ही कोणती पद्धत?

भारताच्या न्यायव्यवस्थेवर हल्ला होता म्हणून त्यांनी माफी मागितली पाहिजे. संविधान कसं नष्ट होईल… लोकशाहीचा गळा घोटण्याच काम कसं होईल हे त्यांच्या मार्फत सुरु आहे. जे आपण पाहतोय ते देशाला घातक आहे. (criticized) अनेक परकीय शक्ती यात आहेत. विदेशी ताकदी आहेत… आंतराष्ट्रीय कट कारस्थानाचा भाग आहे अशी शंका येतेय.

देशाला अराजकतेकडे नेण्याच काम हे करतायत हे अतिशय दुर्दैवी आहे, हे देशाला घातक आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, निवडणुकीत जिंकता येणार नाही… प्रधानमंत्री यांच्यासमोर जिंकता येत नाही म्हणून हे असं करण्याच काम सुरु आहे. यासोबतच एकनाथ शिंदे यांनी काही गंभीर आरोपही केले.

एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, विरोधक देशाच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम करत आहेत. परकीय शक्तीच्या माध्यमातून देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. (criticized) यांच्या देशद्रौही मानसिकतेवर कायम बोलायचे. त्यांची मानसिकता आहे की, केंद्रात आमची सत्ता येणार नाही. या मानसिकेतून त्यांच्याकडून हे दररोज केले जात आहे. विरोधकांकडून संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हेही वाचा : 

अखेर मोदी सरकारने तो निर्णय घेतलाच कांद्याचा भाव धाडकन कमी सामान्यांना मोठा दिलासा

 महाराष्ट्रात दुष्काळ, आयपीएल २०२७ चे सामने दुसऱ्या राज्यात हलवणार कदाचित संपूर्ण स्पर्धाच भारताबाहेर

शिरोळमधून युतीच्या उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मतदानाची ग्वाही