पालखी सोहळ्याने फेडले डोळ्यांचे पारणे

पुष्पवृष्टी करणाऱ्या कलशाच्या आकारात सजलेली पालखी, पोलिस बँडची धून… फुलांच्या पायघड्या… रांगोळ्यांची नक्षी… आणि ‘अंबाबाईच्या नावाने चांगभलं’ ‘ उदे गं अंबाबाई उदं’ ‘अंबामाता की जय’ अशा जयघोषात सोमवारी रात्री अंबाबाईच्या पालखी सोहळ्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. रात्री साडेनऊच्या सुमारास तोफेच्या सलामीनंतर महापौर रुपाराणी निकम व महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. यानंतर पालखी सोहळा सुरू झाला. मंदिराच्या सभोवती भाविकांची अलोट गर्दी होती. फुलांची उधळण करत करवीरवासीयांनी देवीचे रूप नयनांत साठवले.

पालखी गरूड मंडपातून दत्तमंदिर, घाटी दरवाजा, रामाचा पार, शनिमंदिर, नगारखान्यासमोरून पुन्हा गरूड मंडपाच्या सदरेवर विराजमान झाली. मंदिराच्या सभोवती थांबलेल्या भाविकांनी पालखीवर फुलांची उधळण करत देवीचे दर्शन घेतले. पालखी मार्गावर भक्त मंडळांनी प्रसादवाटप केले. नेत्रदीपक आतषबाजीने पालखी सोहळ्याची सांगता झाली. दर्शनरांगेत पाणीवाटप उन्हाच्या झळांमुळे दर्शनरांगेतील भाविकांना जागेवर पाणी देण्याचा उपक्रम देवस्थानतर्फे अखंडित सुरू आहे. (Ambabai) यासाठी पाण्याचे जार मागवण्यात आले असून, रांगेतील भाविकांच्या मागणीनुसार पाणीवाटप सेवा दिली जात आहे.

स्क्रीन बंद असल्याने भाविकांची गैरसोय मंदिर आवार तसेच मंदिर परिसरात फिरत असलेल्या भाविक व पर्यटकांना अंबाबाईच्या गाभाऱ्यातील विधी, पूजारूप, आरती पाहता यावी यासाठी देवस्थान समितीच्या वतीने स्क्रीन लावण्यात आले आहेत. (Ambabai) मात्र, सोमवारी घाटी दरवाजा तसेच बिनखांबी गणेश मंदिराजवळील स्क्रीन बंद असल्याने भाविकांची गैरसोय झाली. मॅटअभावी अंबाबाई मंदिरात भाविकांच्या पायाला चटके करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला असून, दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. मात्र, मंदिराच्या संपूर्ण आवारात मॅट किंवा काथ्याच्या मॅटची व्यवस्था नसल्याने उन्हामुळे तापलेल्या फरशीवरून ये-जा करताना भाविकांच्या पायाला चटके बसत आहेत. मुखदर्शनाच्या रांगेपासून मंदिर परिसरातील वर्दळीच्या मार्गापर्यंत ही समस्या जाणवत असून, भाविकांच्या सुविधांच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुविधांमध्ये कोणतीही तडजोड करू नका, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनीही दिले होते. (Ambabai) मात्र, प्रत्यक्ष उत्सव सुरू झाल्यानंतर तापलेल्या फरशीचा त्रास भाविकांना सहन करावा लागत आहे. दर्शनासाठी मंदिरात जाणारे, दर्शन घेऊन बाहेर पडणारे तसेच परिसरात ये-जा करणारे भाविक यांना विनाआच्छादनाच्या फरशीवरून चालावे लागत आहे. मुखदर्शनाच्या रांगेत उभे असताना हा त्रास अधिक जाणवतो. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची यामुळे गैरसोय होत आहे. लाखो भाविक येणार असल्याचे माहीत असतानाही, फरशीच्या उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी मॅटची व्यवस्था का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. देवस्थान समितीने संपूर्ण मंदिर परिसरातील वर्दळीच्या मार्गांवर मॅट किंवा काथ्याच्या मॅटची व्यवस्था तातडीने करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

अखेर मोदी सरकारने तो निर्णय घेतलाच कांद्याचा भाव धाडकन कमी सामान्यांना मोठा दिलासा

 महाराष्ट्रात दुष्काळ, आयपीएल २०२७ चे सामने दुसऱ्या राज्यात हलवणार कदाचित संपूर्ण स्पर्धाच भारताबाहेर

शिरोळमधून युतीच्या उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मतदानाची ग्वाही