एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची बदली स्वतःच समोर येऊन सांगितलं सत्य

MPSC मधील परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांच्या तपासासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या सचिवपदाची महत्त्वाची जबाबदारी IAS तुकाराम मुंढे यांच्यावर सोपवण्यात आली. ही घोषणा होताच तुकाराम मुंढे यांची एफडीए आयुक्तपदावरून अन्य विभागात बदली करण्यात आली आहे का? अशी चर्चा सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण नेमकं सत्य काय होणार? तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीआरतर्फे भेसळयुक्त अन्न आणि निकृष्ट औषधांविरोधात राज्यभर जोरदार कारवाया सुरू आहेत. (forward) त्यांच्याकडे फक्त MPSC पेपरफुटी प्रकरणातील चौकशीच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची कुठेही बदली झालेली नाही. तुकाराम मुंढे यांनी पोस्ट करत याबाबत स्पष्टीकरण दिले. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर (एक्स/ट्विटर) पोस्ट करत स्पष्ट केले आहे की, त्यांची एफडीएच्या आयुक्तपदावरून कोणतीही बदली झालेली नाही.

“नाही, माझी एफडीएमधून बदली झालेली नाही. मी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र येथे आयुक्त म्हणूनच कार्यरत आहे. असुरक्षित, निकृष्ट दर्जाचे, भेसळयुक्त अन्न आणि बनावट औषधांविरुद्धची आमची लढाई अशीच पुढेही सुरूच राहील,” असे सांगत त्यांनी आपल्यावरील बदलीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. (forward) त्यामुळे आता स्पष्ट झाले आहे की, ते एफडीए आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळण्यासोबतच एमपीएससी चौकशी समितीच्या सचिवपदाचे कामही पाहणार आहेत.

पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षांमधील विविध अनियमितता आणि पेपरफुटी प्रकरणांच्या चौकशीसाठी तीव्र आंदोलन केले होते. आंदोलक विद्यार्थ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अत्यंत कडक आणि पारदर्शक अधिकाऱ्यामार्फत व्हावी (forward) अशी ठाम मागणी केली होती. विद्यार्थ्यांचा तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय कार्यशैलीवर असलेला विश्वास लक्षात घेऊन राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आणि चौकशी समितीच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती केली.

हेही वाचा : 

अखेर मोदी सरकारने तो निर्णय घेतलाच कांद्याचा भाव धाडकन कमी सामान्यांना मोठा दिलासा

 महाराष्ट्रात दुष्काळ, आयपीएल २०२७ चे सामने दुसऱ्या राज्यात हलवणार कदाचित संपूर्ण स्पर्धाच भारताबाहेर

शिरोळमधून युतीच्या उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मतदानाची ग्वाही