साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो ५० रुपये करावा, सी-हेव्ही मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा आणि गळीत हंगाम लवकर सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे, या तीन प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.

या मागण्यांसंदर्भात केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर मंगळवारी (ता. १३) सकाळी अकरापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेसह प्रमुख महामार्गांवर आंदोलन सुरू करण्यात आले. (farmers) माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोगनोळी टोलनाक्यावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले असून, येथे शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. हत्तरकी टोलनाक्यावरही हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
केंद्र सरकारकडून साखरेचा किमान विक्री दर वाढविणे, सी-हेव्ही मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला योग्य दर देणे आणि लवकर गळीत हंगाम सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिटन ५०० रुपये अनुदान देणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. बैठकीतून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोगनोळी टोलनाक्यावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील शेतकरीही मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. (farmers) त्यामुळे सीमाभागात आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतल्याने प्रशासनासमोर वाहतूक व्यवस्थेचे आव्हान निर्माण झाले आहे.
कोगनोळी आणि हत्तरकी टोलनाक्यांवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील पोलिस प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले (farmers) असून, सीमाभागात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
हेही वाचा :
अखेर मोदी सरकारने तो निर्णय घेतलाच कांद्याचा भाव धाडकन कमी सामान्यांना मोठा दिलासा
महाराष्ट्रात दुष्काळ, आयपीएल २०२७ चे सामने दुसऱ्या राज्यात हलवणार कदाचित संपूर्ण स्पर्धाच भारताबाहेर
शिरोळमधून युतीच्या उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मतदानाची ग्वाही