वाळवा तालुक्यातील कामेरी येथे एकाच रात्री तब्बल ५ बंद घरांचे कडी-कोयंडे उचकटून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबवणाऱ्या (local Crime) अट्टल घरफोड्या टोळीच्या म्होरक्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ईश्वरपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने गजाआड केले आहे. प्रवीण राजा शिंदे (वय ३५, रा. गणेशवाडी रोड, वडूज, ता. खटाव, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या संशयित मुख्य सूत्रधाराचे नाव आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल १० लाख ६७ हजार ५५० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि चोरीसाठी वापरलेल्या लोखंडी कटावण्या हस्तगत केल्या. या गुन्ह्यात त्याचे साथीदार आर्यन कान्हा काळे आणि अजय लायन्या शिंदे (दोघे रा. फडतरवाडी, ता. खटाव, जि. सातारा) हे दोघेही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असून, ते सध्या फरार आहेत.
११ सप्टेंबर २०२६ रोजीच्या मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी कामेरी येथील संतोष खाशेराव परीट, बाबू नानाभाऊ आंधळे, विजय बाजीराव पाटील, उज्ज्वला गजानन जाधव आणि सारिका राजेंद्र सोनावले या ५ जणांच्या घरांचे दरवाजे व लाकडी कपाटांचे कडी-कोयंडे उचकटून (local Crime) सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेची चोरी केली होती.
पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे, ईश्वरपूरचे निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह विशेष पथके तयार करण्यात आली होती. (local Crime) दरम्यान, १२ ऑक्टोबर रोजी एलसीबीचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांचे पथक ईश्वरपूर व तासगाव परिसरात गस्त घालत असताना, पाचवा मैल परिसरात एक व्यक्ती संशयितरित्या वावरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून प्रवीण शिंदे याला ताब्यात घेतले.
हेही वाचा :
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रियकराकडून प्रेयसीला दरीत ढकलून खून प्रियकराला पोलीस कोठडी
पुढील 5 दिवस 5 राशींना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ सूर्य-बुध देणार साथ