अपहरणाच्या संशयावरून एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग दिल्लीऐवजी थेट

फ्लायदुबईच्या घटनेने मोठी खळबळ उडाली. त्यातच आता दिल्लीला निघालेल्या विमानात घडलेल्या घडनेने खळबळ उडाली. जर्मनीहून दिल्लीकडे निघालेल्या या विमानाचे आपत्कालीन लँडिंग जयपूरमध्ये करण्यात आले.

फ्लायदुबईची घटना ताजी असतानाच एअर इंडियाच्या विमानाबद्दल धक्कादायक बातमी पुढे येतंय. जर्मनीतील फ्रँकफर्टहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एका विमानाचे आपत्कालीन लँडिंग जयपूर येथे करण्यात आले. विमान हायजॅक झाल्याच्या वृत्तानंतर हे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. (Air India) ज्याने मोठी खळबळ उडाली. मात्र, सुरक्षा यंत्रणांच्या तपासणीत ती बातमी अफवा असल्याचे निष्पन्न झाले. पण प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले. यंत्राना अलर्ट मोडवर आल्या. अहमदाबादमधील एअर ट्रॅफिक कंट्रोलला सकाळी 9 वाजून 05 मिनिटाला एअर इंडियाच्या AI 2030 या विमानाबाबत आपत्कालीन सूचना मिळाली. त्यानंतर दिल्लीकडे न जाता विमानाची दिशा बदलून विमानाला जयपूरकडे वळवण्यात आले.

जयपूरला विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या विमानाने काल रात्री 10 वाजून 45 मिनिटाला उड्डाण केले होते. विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याने विमानतळावरही घबराटीचे वातावरण होते. विमानतळावरील सुरक्षा व आपत्कालीन कार्यपद्धती कार्यान्वित करण्यासोबतच जयपूर पोलिसांचे बॉम्ब शोधक व नाशक पथक, अग्निशमन दल आणि इतर (Air India) अनेक पथके घटनास्थळी दाखल झाली. राजस्थान पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारीही विमानतळावर पोहोचले होते.

सर्व सुरक्षा योजना अगोदरच तयार ठेवण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, विमान मुंबई फ्लाईट इन्फॉर्मेशन रिजनमध्ये असताना वैमानिकाने स्क्वॉक कोड 7500 प्रविष्ट केला. हा कोड वैमानिकांकडे फक्त बेकायदेशीर हस्तक्षेप किंवा विमान अपहरणाचे संकेत असतील त्यावेळीच दिला जातो. हा कोड वैमानिकांनी पाठवल्याने खळबळ उडाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोईंग 787-9 विमानाद्वारे चालवल्या जाणाऱ्या एआय 2030 या विमानाने जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले आणि त्यानंतर सुरक्षेच्या तपासणीसाठी ते आयसोलेशन बेमध्ये हलवण्यात आले.

मालवीय नगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त शिव दयाल यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, बॉम्बची धमकी मिळाल्यामुळे फ्रँकफर्ट-दिल्ली विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. (Air India) त्यानंतर विमानाची सर्व तपासणी करण्यात आल्याची माहिती मिळतंय. दुबईकडून तेल अवीवकडे निघालेल्या विमानात धक्कादायक घटना घडली. थेट को पायलटने हल्ला करत पायलटला जखमी केले आणि विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : 

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रियकराकडून प्रेयसीला दरीत ढकलून खून प्रियकराला पोलीस कोठडी

पुढील 5 दिवस 5 राशींना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ सूर्य-बुध देणार साथ

पावसाळा संपला, तरी माणगंगेची तहान भागेना नदीपात्र कोरडे ठाक