ऑक्टोबर हीटचा सामना करणाऱ्या महाराष्ट्राला पुन्हा पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. राज्यात २० ते २५ ऑक्टोबरच्या (Monsoon) दरम्यान, विजांच्या कडकडाटासह कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांना विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, सातारा, सांगली आणि धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, कोकणातील जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असून, या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली आणि धाराशिव जिल्ह्यांतही काही ठिकाणी विजांसह पाऊस पडू शकतो. (Monsoon) त्यामुळे या भागांतील नागरिकांनी हवामानातील बदलांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कोकणात उष्ण व दमट हवामान पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांतही उन्हाचा चटका वाढण्याची आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
ईशान्य मॉन्सूनमुळे दक्षिण महाराष्ट्रात पावसाचे संकेत देशातून नैऋत्य मॉन्सूनची माघार पूर्ण होत (Monsoon) असताना दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून २० ते २५ ऑक्टोबरदरम्यान दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे सध्या पावसापासून काहीसा दिलासा मिळालेल्या भागांत पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण होऊ शकते.
हेही वाचा :
मोदी कॅबिनेटचा मोठा निर्णय दिवाळीच्या आधीच कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर पण किती दिवसांचा मिळणार
भाजपमध्ये आणखी एक राष्ट्रीय पक्ष विलीन होणार पडद्यामागे घडामोडींना वेग