कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) कांद्याच्या दरात मागील बाजाराच्या तुलनेत प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील जुना कांदा आणि कर्नाटकातील नवीन कांद्याची बाजारात मोठी आवक झाली आहे. महाराष्ट्रातील जुन्या कांद्याच्या चार, कर्नाटकातील नवीन कांद्याच्या २८०, तर कर्नाटकातील जुन्या कांद्याच्या पाच गाड्या दाखल झाल्या होत्या. कांद्याची आवक असतानाही दरात वाढ झाल्याने बाजारातील व्यवहारांना चांगली चालना मिळाली आहे.

दुसरीकडे, बटाट्याच्या दरातही प्रतिक्विंटल २०० रुपयांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील जुन्या लहान कांद्याला प्रतिक्विंटल ३, ५०० ते ४, ००० रुपये, मध्यम कांद्याला ४, ५०० ते ५, ००० रुपये, तर मोठ्या कांद्याला ५, २०० ते ५, ४०० रुपये दर मिळाला. या कांद्याच्या चार गाड्या बाजारात दाखल झाल्या होत्या. कर्नाटकातील नवीन कांद्याची आवक सर्वाधिक झाली. या कांद्याच्या २८० गाड्या बाजारात दाखल झाल्या होत्या.
नवीन लहान कांद्याला प्रतिक्विंटल ३, ५०० ते ४, ००० रुपये, मध्यम कांद्याला ४, ००० ते ४, ५०० रुपये, तर मोठ्या कांद्याला ५, ००० ते ५, ४०० रुपये दर मिळाला. कर्नाटकातील जुन्या कांद्याला प्रतिक्विंटल ३, ५०० ते ५, ४०० रुपये दर मिळाला. बाजारात इंदूर आणि आग्रा येथूनही बटाट्याची आवक झाली होती. मागील बाजाराच्या तुलनेत बटाट्याच्या दरात प्रतिक्विंटल २०० रुपयांनी वाढ झाली. इंदूर बटाट्याच्या सहा गाड्या दाखल झाल्या. व्यापारी खरेदीसाठी दाखल बेळगावच्या एपीएमसी बाजारात दिल्ली, हरियाना, झारखंड आदी राज्यांमधून व्यापारी खरेदीसाठी दाखल झाले आहेत.
हेही वाचा :
मोदी कॅबिनेटचा मोठा निर्णय दिवाळीच्या आधीच कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर पण किती दिवसांचा मिळणार
भाजपमध्ये आणखी एक राष्ट्रीय पक्ष विलीन होणार पडद्यामागे घडामोडींना वेग