कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील हवामान बदलणार

ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढला असला तरी परतीचा पाऊस होत नसल्याचे चित्र राज्यात आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. आज (ता. २४) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. (weather) तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या चार जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.

राज्यात उन्हाचा चटका कायम असून, अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या वर आहे. शुक्रवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत डहाणू येथे राज्यातील उच्चांकी ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोलापूर, रत्नागिरी आणि सांताक्रूझ येथे ३७ अंशांपेक्षा अधिक, तर जळगाव आणि अमरावती येथे ३६ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदविण्यात आले. दुसरीकडे, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील नीचांकी १६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. (weather) त्यामुळे नागरिकांनी उन्हात बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (ता. २३) कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ही हवामान प्रणाली आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्याच्या दिशेने सरकत असताना अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत (ता. २६) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत.(weather) दरम्यान, दक्षिण केरळ आणि लगतच्या अरबी समुद्रात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या क्षेत्राला लागून समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. या दोन्ही हवामान प्रणालींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील हवामानातील बदलांवर लक्ष ठेवले जात आहे.

हेही वाचा : 

अखेर पाऊस आला, राज्यात ऑक्टोबरच्या या तारखेला कोसळधारा, IMD चा महत्त्वाचा अंदाज आला

सकाळ होताच महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर

सांगलीत प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून खंडणीची मागणी