५ माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा गुजरातचे माजी मुख्यममंत्री शंकरसिंह वाघेला यांनी घरवापसीची इच्छा केली व्यक्त देशामध्ये काँग्रेसची ताकद वाढणार

निवडणूक आयोगाचा मनमानी कारभार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. राहुल गांधींकडून मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल सुरू आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून दिल्लीत राजकारण तापले आहे. (Congress) अशातच गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वागेला यांच्यासह ५ माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांच्यासह ५ माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसमध्ये परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शंकर सिंह वाघेला यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली. (Congress) यावर प्रतिक्रिया देताना गुजरात काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी शंकर सिंह वाघेला यांच्या काँग्रेस प्रवाशाच्या वृत्ताचे खंडन केले नाही किंवा त्यांनी ते घरवापसी करत असल्याबाबतही काहीच सांगितले नाही. माध्यमांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, काही घडल्यास मी तुम्हाला सर्वात आधी सांगेन.
राहुल गांधी यांनी सध्या निवडणूक आयोगाविरोधात घेतलेली स्ट्राँग भूमिका यामुळे एक चांगला मेसेज सर्वांपर्यंत पोहचला आहे. त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यामुळे ५ माजी मुख्यमंत्री काँग्रेस पक्षात परत येऊ शकतात, असे दावे केले जात आहेत. यामध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग (पंजाबचे माजी मुख्यमंत्री), गुलाम नबी आझाद (जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री), शंकरसिंह वाघेला (गुजरातचे माजी मुख्यमंत्री), अशोक चव्हाण (महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री) आणि किरण कुमार रेड्डी (आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री) यांचा समावेश आहे.
शंकर सिंह वाघेला वगळता इतर कोणत्याही माजी मुख्यमंत्र्याने काँग्रेस पक्षात परत येण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते, जर ५ माजी मुख्यमंत्र्यांपैकी कोणीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर चित्रच बदलेल.(Congress) यापैकी बहुतेक माजी मुख्यमंत्र्यांनी कठीण काळात पक्षाची साथ सोडली होता. प्रश्न असा निर्माण होतो की, राहुल गांधी या पाच माजी मुख्यमंत्र्यांपैकी कुणाला पक्षात परतण्यासाठी कोणाला संधी देतील. अशोक चव्हाण वगळता इतर चार माजी मुख्यमंत्र्यांकडे कोणतेही मोठे राजकीय पद नाही.
हेही वाचा :
अखेर पाऊस आला, राज्यात ऑक्टोबरच्या या तारखेला कोसळधारा, IMD चा महत्त्वाचा अंदाज आला