लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज या महिन्याच्या शेवटी खात्यात पैसे जमा होणार , ₹1500 की ₹3000 मिळणार 

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी गुड न्यूज
लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबरचे पैसे लवकरच मिळणार
या महिन्याच्या शेवटी लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार

फडणवीस सरकारची ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या हप्त्याचे १५०० रुपये मिळाले. (Women) आता त्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे ३००० रुपये एकत्र मिळतील अशी आशा आहे. हे पैसे आले तर लाडक्या बहिणींना दिवाळीतील खर्चासाठी हातभार लागेल. अशातच लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींनीना या महिन्याच्या अखेरीस म्हणजे दिवाळीपूर्वी पैसे मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दिवाळीपूर्वी सरकार लाडकींना पैसे देण्याचा विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Women) आतापर्यंत सरकार कुठल्याही सणाच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करत आले आहे. त्यामुळे सरकार लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वी खुश करण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वीच लाडकींच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जातील असा अंदाज आहे.

असे देखील सांगितले जात आहे की, सरकार सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये आणि ऑक्टोबर महिन्याचे १५०० असे एकूण ३००० रुपये एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करू शकतात. (Women) यामुळे लाडक्या बहिणींना दिवाळी आनंदात साजरा करता येईल. सरकारने लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे पैसे कधीपर्यंत द्यायचे याबाबत अधिकृत निर्णय घेतला नाही. पण लवकरच सरकार याबाबत निर्णय घेऊन पैसे वितरीत करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी ही योजना सुरू केली. २१ ते ६५ वयोगटातील महिलांना या योजनेअंतर्गत सन्मान निधी दिला जातो. राज्यातील १ कोटी ६६ लाख पात्र लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो. प्रत्येक पात्र लाडक्या बहीणीच्या खात्यावर डीबीटीद्वारे दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. २०२६ च्या सुरुवातीला केलेल्या ई-केवायसीनंतर ८० लाखांपेक्षा जास्त लाडकी बहिणींचे नाव या योजनेतून वगळण्यात आले होते.

हेही वाचा : 

अखेर पाऊस आला, राज्यात ऑक्टोबरच्या या तारखेला कोसळधारा, IMD चा महत्त्वाचा अंदाज आला

सकाळ होताच महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर

सांगलीत प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून खंडणीची मागणी