जंगमवाडी (ता. हातकणंगले) येथे गावातील गटारीचे काम केले नसल्याच्या कारणावरून माजी सरपंच सरिता मोरे यांच्या घरात घुसून तिघांनी त्यांना व त्यांच्या ७६ वर्षीय सासऱ्यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता. २३) रात्री घडली. या हल्ल्यात सासरे संभाजी मोरे यांच्या डाव्या खांद्यावर व डोळ्याजवळ लोखंडी गजाने मार लागून ते जखमी झाले. तसेच सरिता मोरे यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्या दुचाकीचेही नुकसान केले. (Shocking) याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रामचंद्र खोत, प्रशांत खोत आणि प्रतीक खोत (तिघे रा. जंगमवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरिता मोरे यांनी २०२३ ते फेब्रुवारी २०२६ या काळात जंगमवाडीच्या सरपंच म्हणून काम पाहिले आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिघे संशयित त्यांच्या घरी गेले. सरपंच असताना चांगले काम केले नाही, (Shocking) तसेच घराजवळील गटारीचे काम केले नाही, असे म्हणत त्यांनी शिवीगाळ सुरू केली.त्यावेळी सरिता मोरे यांचे सासरे संभाजी यांनी शिवीगाळ का करता, अशी विचारणा केली. त्यावरून संतप्त झालेल्या रामचंद्र खोत याने लोखंडी गजाने संभाजी यांच्या डाव्या खांद्यावर व डाव्या डोळ्याजवळ वार केला. अन्य दोघांनी लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली.
सासऱ्यांना सोडविण्यासाठी सरिता मोरे पुढे आल्या असता, (Shocking) त्यांनाही धक्काबुक्की करून अश्लील शिवीगाळ करण्यात आली. जाताना प्रशांत खोत याने सरिता मोरे यांच्या आयक्यूब दुचाकीच्या पुढील भागाची तोडफोड करून नुकसान केले. या प्रकरणी शनिवारी मध्यरात्री शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा :
अखेर पाऊस आला, राज्यात ऑक्टोबरच्या या तारखेला कोसळधारा, IMD चा महत्त्वाचा अंदाज आला