शेतकऱ्यांच्या घामाची योग्य किंमत मिळालीच पाहिजे

जयसिंगपूर शेतकऱ्यांचा ऊस हा काही फुकटचा नाही. घामाची योग्य किंमत मिळाल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. (farmers) चार दिवसांत कारखानदार आणि प्रशासनाने समाधानकारक तोडगा काढला नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडेल. पहिली उचल ४,५०० रुपये मिळालीच पाहिजे, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चालू हंगामात प्रतिटन ४,५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांची मोटारसायकल जनजागृती रॅली काढण्यात आली. दिवसभरात तब्बल १८५ किलोमीटरचा टप्पा पार करणाऱ्या या रॅलीने संपूर्ण जिल्हा ढवळून काढला.

हातकणंगले येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात झाली. (farmers) यामध्ये हजारो शेतकरी दुचाकीसह, हातात संघटनेचे झेंडे घेऊन उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.ही रॅली हातकणंगले येथून सुरू होऊन कुंभोज, नरंदे, सावर्डे, वडगाव, वाठार, वारणानगर, वाघबीळ, आसुर्ले पोर्ले, खुपिरे, सांगरूळ, सडोली खालसा, परिते, बिद्री, वाळवे, सिद्धनेर्ली आणि कागल या प्रमुख गावांमधून मार्गस्थ झाली. कसबा सांगाव येथे या रॅलीची सांगता झाली.

कोपार्डे : ऊस म्हणजे चुरमुरे नव्हेत. ऊस दर निश्चित न करता उसाला हात लावण्याचा प्रयत्न केल्यास सरकारच्या छाताडावर बसू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. ही मोटारसायकल रॅली कुंभी कारखान्यावरून भोगावती कारखान्याकडे रवाना झाली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, धनाजी पाटील, सचिन शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कसबा सांगाव : दुष्काळाचे संकट दाखवून धरणे भरली असताना सुद्धा नद्या कोरड्या ठेवून भारनियमन करून शेतकऱ्यांना धारेवर धरत ऊस दराचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन तीव्र करू, (farmers) असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. कसबा सांगाव (ता. कागल) येथील चावडी चौकात रॅलीच्या सांगता सभेत ते बोलत होते.

हेही वाचा : 

दिवाळीआधीच मोठी खुशखबर धडकणार सरकारी कर्मचाऱ्यांचा DA वाढणार

आनंदाची बातमी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव

आंध्रातील चक्रीवादळाचा कोल्हापूरला तडाखा दुष्काळी जिल्ह्याला दिलासा