देवेंद्र फडणवीस यांचाही गेम होणार होता मनोज जरांगे यांचा आणखी एक अ‍ॅटम बॉम्ब मोठी खळबळ

मनोज जरांगे पाटील यांनी खळबळजनक दावा केला आहे की कथित क्लिपमधून एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले जात होते. त्यांनी फडणवीसांना या षडयंत्रामागे कोण होते याचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे. ही क्लिप शिंदे आणि भाजपच्या राजकीय प्रतिमेला डॅमेज करण्यासाठी तयार केली होती, असा आरोपही जरांगे यांनी केला.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. त्या कथित क्लिपमधून एकनाथ शिंदे यांचा गेम करण्याचा प्रयत्न होताच. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही गेम करण्याचा प्रयत्न होता, असा खळबळजनक दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. क्लिपमध्ये बोलणारे लोकच यांचा गेम करणार होते. (sensational) यामागे देशातून कोणी होतं का? या लोकांचा हेतू काय होता? याचा शोध देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पाहिजे, अशी मागणीच जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना केली आहे.

ही क्लिप ऐकवल्यानंतर मूळावर घाव बसलाय. त्यांना काहीच सूचत नाहीये. ते आतून बिथरले आहेत. एकनाथ शिंदेंही खोटा आरोप सहन करू शकत नाहीत. त्यांनी पैसेच घेतले नाही. क्लिपमध्ये बोलणारे जे कोण लोकं आहेत, त्यांनी डाव का रचला? याचा शोध एकनाथ शिंदे घेतील. मित्र पक्षापेक्षा, सत्तेपेक्षा वैयक्तिक प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. हा वैयक्तिक घाव आहे. शिंदेंचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करायचं होतं का? हा मोठा प्रश्न शिंदेंसमोर आहे. म्हणून ते सुद्धा या प्रकरणाचा शोध घेतील. ते वरून वरून गोड बोलत असले तरी आतून मोठी खदखद आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मला काल जी माहिती मिळाली त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांना अंधारात ठेवून हे षडयंत्र रचलं गेलं आहे. जे कोणी सात आठजण क्लिपमध्ये बोलतात, ते आता भाजप त्यांना संपवत असल्याचं बोलत आहेत. हेच लोक शिंदे आणि भाजपला संपवायला निघाले होते. (sensational) आता ते उलटा कांगावा करत आहेत. आपल्या मागे काय घडलं हे फडणवीस यांना माहीत नसेल. पण थोडं खोलात गेलं तर फडणवीस यांचाही गेम होणार होता. पण यांचाच गेम झाला. शिंदेंचाही गेम होणार होता. फडणवीस यांही होणार होता. असा तर्क आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

क्लिपमध्ये बोलणाऱ्या चार पाच जणांना वाचवलं नाही आणि त्यांच्यावर कारवाई केली तर या षडयंत्रामागे फडणवीस आणि शिंदे नव्हते हे सिद्ध होईल. या दोघांच्या अपरोक्ष पडद्यामागून मोठं षडयंत्र शिजत होतं, हे सिद्ध येईल. क्लिपमध्ये बोलणारे हे लोक आता व्हिडीओ व्हायरल करत आहेत. भाजप आम्हाला संपवतंय असं हे लोक म्हणत आहेत. असं मला कळलं. मी काही त्यांचे व्हिडिओ पाहिले नाही. हे बोलणारे लोक कोण आहेत? हा शिंदे आणि फडणवीसांनाही प्रश्न असेल. हे लोक कुणाशी संबंधित आहे. यांच्या मागे देशातील कुणाचा हात आहे का? हे फडणवीस आणि शिंदेंनी शोधलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय.

यातील एकाने व्हिडिओ केला आणि भाजप आम्हाला संपवत आहे, आम्ही भाजप आणि फडणवीसांसाठी काम करतोय, असं म्हणत आहे. यांना मदत करण्यासाठी देशातून कोणती यंत्रणा राबत होती हे शोधलं पाहिजे. नाही शोधलं तर मग यामागे फडणवीस होते असा अर्थ निघेल. पण माझ्या माहिती प्रमाणे फडणवीस याचा शोध घेतील. हा विचित्र प्रकार आहे. (sensational) यामुळे भाजप डॅमेज होऊ शकतो. शिंदे डॅमेज होऊ शकतात. मराठा मते तुमच्यापासून दूर होऊ शकतात, असंही त्यांनी म्हटलंय.

हा व्हिडीओ एआयने तयार केलेला असल्याचं बोललं जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. एआय आम्ही कशाला बनवू? आमच्याकडेचे मोबाईल बरोबर नाही. आम्ही हा व्हिडिओ केला असता तर त्यात वाढवण बंदराचा विषय कशाला घेतला असता? अमेरिकेचा विषय कशाला घेतला असता? कर्नाटकाचा विषय आम्ही कशाला काढू? शरद पवार, उद्धव ठाकरे आणि पेपरवाल्यांचा आम्ही कशाला उल्लेख केला असता? संपादकांचा उल्लेख कशाला केला असता? आमचं काय त्यात अडकलंय? असा सवाल त्यांनी केला.

हेही वाचा : 

दिवाळीआधीच मोठी खुशखबर धडकणार सरकारी कर्मचाऱ्यांचा DA वाढणार

आनंदाची बातमी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव

आंध्रातील चक्रीवादळाचा कोल्हापूरला तडाखा दुष्काळी जिल्ह्याला दिलासा