मोदी का बाप भी जायेगा खरगेंच्या विधानामुळे अमित शाहा संतापले काँग्रेसचा इतिहासच बाहेर काढला

अमित शाह यांनी एक ट्वीट केलंय. या ट्वीटमध्ये त्यांनी खरगेंवर थेट टीका केलीय. (Modi’s father) खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांवर एक विधान करून सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, अशी टीका केलीय.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांविषयी एक भाष्य केले आहे. पाटण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलंय. (Modi’s father) त्यांच्या या विधानामुळे आता मोठा राजकीय वाद पेटलाय. खरगे यांचे हे विधान वादग्रस्त आणि अपमानास्पद असल्याचं भाजपाचे नेते म्हणत आहेत. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील थेट ट्वीट करत खरगे यांच्यावर तसेच काँग्रेसवर तिखट शब्दांत निशाणा साधलाय. त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या काही जुन्या विधानांचाही संदर्भ देत काँग्रेसचा जनाधार संपला आहे, असा मोठा दावा केलाय. खरगे बिहार राज्यातील पाटणा येथे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते भाजपावर टीका करत होते. याच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या एका श्रोत्याने ‘मोदी नही जायेंगे’ असं विधान केले. त्यालाच उत्तर म्हणून ‘मोदी का बाप भी जाऐगा’ असं प्रत्युत्तर खरगे यांनी दिलं. सभेत बोलत असतानाच सर्वांसमोर खरगेंनी हे विधान केलंय. त्यांच्या याच विधानावर आता आक्षेप घेतला जातोय.

अमित शाह यांनी एक ट्वीट केलंय. या ट्वीटमध्ये त्यांनी खरगेंवर थेट टीका केलीय. खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांवर एक विधान करून सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. असा प्रकार पहिल्यांदाच झालाय असं नाही. काँग्रेस पक्षाने कधी मोदी यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले. तर कधी मोदी यांना ‘मौत का सौदागर’ म्हणून हिणवलं. कधी मोदी यांना ‘चायवला’ म्हणत त्यांच्या गरिबीची उपहास करण्यात आला. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस पक्ष रोज सभ्यतेच्या सर्व मर्यादा पार करत आहे, असा हल्लाबोल अमित शाह यांनी केला. (Modi’s father) तसेच, गेल्या 12 वर्षात काँग्रेस पक्षाचा वेगवेगळ्या निवडणुकीत सलग पराभव झालाय. त्यामुळेच त्यांच्याकडे आता कोणतीही रणनीती राहिलेली नाही. ते फक्त शिवीगाळ करतात. काँग्रेसचा जनाधार संपला आहे. आता काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेही त्यांच्यापासून दूर होत आहेत, अशी टीकाही अमित शाहांनी केलीय. आता काँग्रेस खरगे यांच्या विधानावर काय स्पष्टीकरण देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : 

दिवाळीआधीच मोठी खुशखबर धडकणार सरकारी कर्मचाऱ्यांचा DA वाढणार

आनंदाची बातमी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव

आंध्रातील चक्रीवादळाचा कोल्हापूरला तडाखा दुष्काळी जिल्ह्याला दिलासा