ऑक्‍टोबर हीटचा झटका विजेच्‍या मागणीत दुप्‍पट वाढ

कोल्‍हापूर ‘अल निनो’मुळे यंदा वातावरणातील बदल झपाट्याने होत आहेत. सप्‍टेंबरमध्‍येच पाऊस गायब झाल्‍याने उष्‍णता वाढली आहे. वाढत्‍या उष्‍णतेसह विजेच्‍या वापरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यंदा सप्‍टेंबरमध्‍येच ऑक्‍टोबर हीटचा झटका बसला. पावसाळ्याचा महिना समजल्‍या जाणार्‍या सप्‍टेंबरमध्‍ये विजेच्‍या मागणीत दुप्‍पट वाढ झाल्‍याचे समोर आले आहे. तर ऑक्‍टोबरमध्ये विजेच्‍या मागणीत दुप्‍पट ते तिप्‍पट वाढ झाल्याचे दिसत आहे.

अल निनोमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले असून, यंदा केवळ ५२ टक्‍के पाऊस झाला आहे. तर गतवर्षी ७१ टक्‍के पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्‍याने राज्‍य शासनाने दुष्‍काळ जाहीर केला आहे. सप्‍टेंबर कोरडा गेल्‍याने पावसाळ्यातील महिना समजला जाणार्‍या या सप्‍टेंबरमध्‍ये मोठ्या प्रमाणात उकाडा होता. परिणामी फ्रीज, एअरकंडिशनर, पंखे या इलेक्‍ट्रीक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. (temperature) त्‍यामुळे विजेच्‍या मागणीतही लक्षणीय वाढ झाल्‍याचे समोर आले आहे.

घरगुती विजेच्‍या मागणीसह शेतीपंपांच्‍या मागणीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्‍याची आकडेवारी समोर आली आहे. गतवर्षी सप्‍टेंबर महिन्‍याचा जिल्‍ह्याचा एकूण वीजवापर १५ हजार ८३९.०६ मेगावॅट होता. (temperature) यामध्‍ये कृषिपंपांचा वीजवापर तीन हजार २३९.७३ मेगावॅट इतका झाला आहे. तर यंदा सप्‍टेंबर महिन्‍याचा वीजवापर दुप्‍पट झाला आहे. यंदाच्‍या सप्‍टेंबर महिन्‍यात विजेचा वापर एकूण ३१ हजार ५६.६८ मेगावॅट इतका झाला आहे. तर शेतीपंपांच्‍या वीज वापरातही चौपट वाढ झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. यंदा सप्‍टेंबर महिन्‍यात शेतीपंपांसाठी तब्‍बल ११ हजार २५ मेगावॅट वीज वापरण्‍यात आली आहे.

गतवर्षी सप्‍टेंबर महिन्‍यात १३ सप्‍टेंबर रोजी विक्रमी म्‍हणजे ९९६.५६ मेगावॅट वीज वापरण्‍यात आली होती. तर यंदाच्‍या सप्‍टेंबर महिन्‍यात १७ सप्‍टेंबर रोजी एक हजार १८३.७२ मेगावॅट वीज वापरल्‍याचे आकडेवारीवरून स्‍पष्‍ट झाले आहे. यंदा ऑक्‍टोबरमध्‍ये २८ हजार ५३२ मेगावॅट विजेचा वापर झाला आहे. (temperature) तर गतवर्षी ऑक्‍टोबरमध्‍ये २४ हजार ३२० हजार ८७६ मेगावॅट वीज वापरण्‍यात आली आहे. यंदा ऑक्‍टोबरमध्‍ये १५ तारखेस सर्वाधिक म्‍हणजे एक हजार २७७ मेगावॅट वीज वापरली तर गतवर्षी सर्वाधिक वीज २० ऑक्‍टाबर रोजी ९६३ मेगावॅट वीज वापरली. ऑक्‍टोबर हीटमुळे ऑक्‍टोबरमध्‍ये विक्रमी वापर दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्‍यात मोठ्या प्रमाणात वीजवापर होतो. यंदा अल निनोच्‍या प्रभावामुळे सप्‍टेंबरमधील वीजवापर पाहता ऑक्‍टोबर महिन्‍यातही गतवर्षीच्‍या तुलनेत तिप्‍पट वापर होण्‍याची शक्‍यता आहे.

हेही वाचा : 

देवेंद्र फडणवीस यांचाही गेम होणार होता मनोज जरांगे यांचा आणखी एक अ‍ॅटम बॉम्ब मोठी खळबळ

खुशखबर पीएम किसानचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबरला मिळणार

संजय राऊत थेट राष्ट्रवादीला भिकारी म्हणाले अचानक हल्ला का