अजित पवार यांच्या निधनाला 9 महिने उलटले तरी अपघाताचे गूढ कायम आहे. तपासात प्रगती नसल्याने समर्थकांत संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर जय पवार आज सीआयडी कार्यालयात तपास कुठपर्यंत आला याची माहिती घेण्यासाठी गेले आहेत. सीआयडी काय माहिती देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, दिवंगत अजित पवार यांच्या निधनाला 9 महिने उलटून गेले आहेत. मात्र, अजूनही अजितदादांच्या अपघाताचं गूढ उकलेलं नाहीये. (Jai Pawar) त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सीआयडी या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र, या प्रकरणातील कोणताही अपडेट समोर येत नसल्याने अजितदादांच्या समर्थकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जय पवार थोड्याच वेळात सीआयडी कार्यालयात जाणार आहे. अजितदादांच्या अपघाताचा तपास कुठपर्यंत आला याची माहिती घेण्यासाठी जय पवार सीआयडी कार्यालयात जात आहेत.
जय पवार थोड्याच वेळात पुणे सीआयडी कार्यालयात जाणार आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर मागील 9 महिन्यात तपास कुठपर्यंत आला याबाबत जय पवार माहिती घेणार आहेत. त्यामुळे सीआयडी जय यांना काय माहिती देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सीआयडी अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर जय पवार मीडियाशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
अजितदादा यांच्या निधनानंतर हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला होता. रोहित पवार यांनी वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतचे पुरावे सादर केले होते. (Jai Pawar) तसेच या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी आधी गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली होती. गुन्हा दाखल करून घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता. पण त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नव्हता.
याच दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, आजतागायत हे प्रकरण सीबीायकडे देण्यात आलेलं नाही. हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आलं आहे. (Jai Pawar) त्यावरून विरोधकांनी वारंवार अजितदादा गटावर हल्ला चढवला होता. सत्तेत असून देखील अजितदादांच्या अपघात प्रकरणाच्या चौकशीवर अनास्था दिसत असून अजित पवारांचं कुटुंबीय या अपघातावर काहीच बोलत नसल्याची टीका केली जात होती. या पार्श्वभूमीवर आज जय पवार सीआयडी कार्यालयात जात असल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज 9 महिने पूर्ण होत आहेत.
हेही वाचा :
मोठी बातमी एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी वेतनाचा मार्ग मोकळा
फोनमध्ये SIM नसेल तर WhatsApp बंद होणार का काय होणार नेमका बदल