BMC कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, दिवाळीपूर्वी इतके रुपये मिळणार

मुंबई महानगरपालिकेकडून कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनसची घोषणा
बीएमसी कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार
बीएमसी कर्मचाऱ्यांच्या बोनस रकमेत मागच्या वर्षीच्या तुलनेत २ हजार रुपयांची वाढ

दिवाळीपूर्वी सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला जात आहे. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक महानगर पालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला. (employees) त्यापाठोपाठ आता मुंबई महानगर पालिकेने देखील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा केली आहे. बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपये बोनस मिळणार आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. बोनस जाहीर झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अधिकारी, कर्मचारी आणि कामगार यांना दीपावली २०२६ साठी बोनस जाहीर करण्यात आला आहे. आज मुंबईच्या महापौर रितू तावडे पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती देणार आहेत.(employees) मागच्या वर्षी मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ३१,००० रुपये बोनस देण्यात आला होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या बोनसमध्ये तब्बल २००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना ३३,००० रुपये बोनस स्वरूपात मिळणार आहेत. (employees) त्यामुळे बीएमसी कर्मचाऱ्यांची दिवाळी दणक्यात होणार आहे. बोनसपोटी पालिकेच्या तिजोरीवर सुमारे ३०० कोटीं पेक्षा जास्त भार येणार आहे. बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी बोनसबाबतच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दरम्यान, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना २१ हजार रुपयांचा दिवाळी बोनस दिला जाणार आहे. तर आशा सेविकांना ६००० रुपये बोनस दिला जाईल. केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांनी दिवाळी बोनसची घोषणा केली. दिवाळीपूर्वी केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे.

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेत काम करणारे वर्ग १ आणि वर्ग २ चे अधिकारी आणि सर्व श्रेणीतील कामगार, ठोक पगारी, वाहन चालक, केडीएमटीचे कामगार, महापालिकेच्या शाळेतील शिक्षक, विविध आरोग्य योजनेसाठी काम करणारे कामगार या सर्वांना दिवाळीपूर्वी बोनस दिला जाणार आहे.

हेही वाचा : 

मोठी बातमी एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी वेतनाचा मार्ग मोकळा

फोनमध्ये SIM नसेल तर WhatsApp बंद होणार का काय होणार नेमका बदल

गळवेवाडीत आर्थिक वादातून कुटुंबास मारहाण