नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला होता. विशेषतः ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या माध्यमातून आंदोलनात सहभागी झालेल्या जेन-झी आंदोलकांनी इन्स्टाग्रामचा वापर करत आपली भूमिका मांडली होती. आंदोलनाचे हजारो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आले होते. मात्र, (Abhijit Deepak) यातील अनेक व्हिडीओ आता डिलीट झाल्याचा दावा केला जात आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही यासंदर्भात ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली आहे. आंदोलनाशी संबंधित व्हिडीओ हटवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Abhijit Deepak) तसेच केंद्र सरकारकडून सरकारविरोधी अनेक पोस्ट हटवल्या जात असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात आंदोलन सुरू झाल्यानंतर इन्स्टाग्राम हे आंदोलकांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ बनले होते. जेन-झी आंदोलकांनी व्हिडीओच्या माध्यमातून आंदोलनाची माहिती, आपली नाराजी आणि विविध मागण्या लोकांपर्यंत पोहोचवल्या होत्या. त्यामुळे सोशल मीडियावरील या व्हिडीओंच्या कथित डिलीट होण्याच्या प्रकारामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
मात्र, संबंधित व्हिडीओ नेमक्या कोणत्या कारणामुळे हटवण्यात आले, (Abhijit Deepak) त्यामागे सरकारची भूमिका आहे का आणि या आरोपांना अधिकृत पुष्टी मिळाली आहे का, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील दावे आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती याबाबत अधिकृत स्पष्टीकरण महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी वेतनाचा मार्ग मोकळा
फोनमध्ये SIM नसेल तर WhatsApp बंद होणार का काय होणार नेमका बदल