ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा जिल्ह्यात शेतकरी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. काय आहे मोठी अपडेट
ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. ऊसाचा दर वाढवण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून स्वाभिमानीचा सरकार आणि कारखानदाराशी झगडा सुरू आहे. (Farmers) पण तोडगा न निघाल्याने शेतकरी आणि कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पहिली ठिणगी पडली आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी ऊस वाहतूक करणारी वाहनं आडवल्याने लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून चोराडे फाट्यावर १०० ऊस वाहने रोखली (Farmers) यंदाच्या ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खटाव तालुक्यात आपले आंदोलन तीव्र केले आहे. संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल पवार आणि तालुकाध्यक्ष दत्तूकाका घार्गे यांच्या नेतृत्वाखाली मल्हारपेठ-पंढरपूर महामार्गावरील चोराडे फाट्यावर विविध कारखान्यांची सुमारे १०० ऊस वाहतूक वाहने रोखून धरण्यात आली आहेत. “यंदाचा ऊसदर जाहीर झाल्याशिवाय एकही वाहन पुढे जाऊ देणार नाही,” असा आक्रमक पवित्रा घेत संघटनेने कारखानदारांना ठाम इशारा दिला आहे. लवकरात लवकर ऊस दर जाहीर करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेश कार्याध्यक्ष यांनी याप्रकरणी अनिल पवार यांनी सरकारला इशारा दिला आहे.
ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सांगली जिल्ह्यातील आंदोलन आक्रमक झाले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेली ऊस वाहतूक स्वाभिमानीकडून रोखण्यात येत आहे.कराडच्या कृष्णा कारखान्यासाठी सुरू असलेली ऊस वाहतूक ईश्वरपूर नजकीच्या बहे येथे रोखण्यात आली होती. स्वाभिमानीची माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊस वाहतूक रोखण्यासाठी छावणी आंदोलन करत सुमारे 70 ते 80 उसाचे ट्रॅक्टर ट्रॉल्या रोखण्यात आले होत्या, (Farmers) तर दुसऱ्या बाजूला सांगली मधील ईश्वरपूर बायपास रोडवर इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याच्या ट्रॅक्टर ट्रॉली देखील रोखण्यात आल्या होत्या 25 ते 30 उसाने भरलेली वाहन स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखली होती, ऊसाला चार हजार पाचशे रुपये दर मिळालाच पाहिजे त्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संघटक मनोहस पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा :
सर्वात मोठी बातमी जय पवार थेट सीआयडी कार्यालयात काय आहे प्रकरण
BMC कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, दिवाळीपूर्वी इतके रुपये मिळणार
मनोज जरांगे दारू पितात का काय दिलं उत्तर म्हणाले, मी आत्महत्याच