लाडक्या बहि‍णींना दिवाळीआधीच हप्ता मिळणार, खात्यात १५०० येणार की ३००० रुपये

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींसाठी आनंदाची बातमी
दिवाळीपूर्वी लाडकींच्या खात्यावर जमा होणार पैसे
लाडकींना रुपये १५०० की ३००० मिळणार यासंदर्भात महत्वाची अपडेट आली समोर

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार यांची वाट पाहत आहेत. त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे. पण लाडक्या बहिणींना १५०० रुपये मिळणार की ३००० रुपये मिळणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. (women) लाडक्या बहिणींना फक्त सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये म्हणजे एकच हप्त्याचे पैसे मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे देण्यासाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. महिला व बाल विकास विभागाला निधी मंजूर करण्यास सरकारने बुधवारी परवानगी दिली. लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये देण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी या योजनेकडे वळवला. (women) अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र महिलांना पैसे देण्यासाठी ३४४.६२ कोटी रुपये इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख सचिव, महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात येणार आहे.

३४४.६२ कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर झाल्यानंतर आता दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यावर सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये जमा होणार आहेत. या पैशातून लाडक्या बहिणींना दिवाळी साजरी करता येईल आणि त्यांना घर खर्चामध्ये हातभार लागेल. सरकार नेहमी सणासुदीचे औचित्य साधत लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ देत आले आहे. (women) त्यामुळे यावेळी देखील सरकार दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना खूश करणार आहे. सप्टेंबरच्या हप्त्याचे पैसे कधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार याबाबत अद्याप अधिकृत तारीख सांगण्यात आली नाही पण सरकार लवकरच याची घोषणा करेल.

हेही वाचा : 

सर्वात मोठी बातमी जय पवार थेट सीआयडी कार्यालयात काय आहे प्रकरण

BMC कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, दिवाळीपूर्वी इतके रुपये मिळणार

मनोज जरांगे दारू पितात का काय दिलं उत्तर म्हणाले, मी आत्महत्याच