कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
मुरली मनोहर जोशी हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये शिक्षण मंत्री असताना त्यांनी महाविद्यालयीन अभ्यास क्रमात ज्योतिष विषयाचा समावेश करण्याबद्दल भाष्य केले होते. तसा विचार बोलून दाखवला होता. अर्थात तेव्हा मनुवादी सरकार अशी टीका झाल्यानंतर हा विषय मागे पडला. तथापि सध्या काही राजकीय नेत्यांनी ते जणू ज्योतिष विद्यापीठाचे स्नातक आहेत असे समजून भाकीत करायला सुरुवात केली आहे. (including) आता त्यात महाराष्ट्राचे एक मंत्री सहभागी झाले आहेत. राज्यात आणि देशात नजीकच्या काही महिन्यात काहीतरी महाभयंकर होणार आहे असे भाकीत या मंडळींनी केले आहे.

केंद्रात मुरली मनोहर जोशी हे शिक्षण मंत्री असताना महाराष्ट्रात शिवसेनेचे मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते. त्यांनी महाविद्यालयीन अभ्यासक्रमात ज्योतिष विषय असायला काय हरकत आहे अशी टिपणी केली होती. मात्र त्यांनी नंतर शिक्षणामध्ये मूल्याधिष्ठित विषय असले पाहिजेत अशी सारवा सारव केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी असेच एक चक्रावून टाकणारे राजकीय भाकीत केले आहे. (including) येत्या काही महिन्यात देशात राजकीय उलथापालथ होणार आहे. आणि काही दिवसांसाठी या देशाला पंतप्रधान नसणार आहे. असे म्हटले आहे. जेन झी चे आंदोलन, सी जे पी चे आंदोलन, इंडिया आघाडीचे आंदोलन या राजकीय पार्श्वभूमीवर त्यांनी हे भाकीत केलेले असावे. प्रशांत भूषण यांनी रेझीम चेंज अर्थात निवडणुकीशिवाय सत्ता पालट होईल असे म्हटले होते. त्याचाही राज ठाकरे यांनी आपल्या राजकीय भाकितासाठी आधार घेतलेला असावा. भारतामध्ये सत्तापालट झालाच तर तो निवडणुकीच्या माध्यमातून होतो याचा विसर प्रशांत भूषण यांना पडलेला असावा.
काही दिवस या देशाला पंतप्रधान नसेल हे भाकीत मात्र त्यांचे बिन बुडाचे आहे. त्याला कोणताही आधार नाही. घटनात्मक आधार तर नाहीच नाही. कारण भारतीय संविधानानुसार हा देश कोणत्याही स्थितीत निर्नांयकी अवस्थेत ठेवला जाऊ शकत नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर पंतप्रधान राजीव गांधी यांचे देता येईल. पंतप्रधान इंदिराजी गांधी यांची हत्या झाल्यानंतर, राजीव गांधी यांची पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांनी राजीव गांधी यांना पंतप्रधान म्हणून शपथ दिल्यानंतर इंदिराजी गांधी यांच्या मृत्यूची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली.संविधानातच तशी तरतूद असल्यामुळे या देशाला पंतप्रधान नाही अशी वेळ येणार नाही. राज ठाकरे यांनी गणेशोत्सवामध्ये हिंदू मुस्लिम यांच्यात दंगली घडवल्या जातील असेही भाकीत केले होते. अर्थात महाराष्ट्रात गणेशोत्सवामध्ये कोणत्याही शहरात किंवा गावात हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा गेला नाही. त्यामुळे त्यांचे हे भाकीत कुरमुडया ज्योतिषा सारखे ठरले आहे.
महाराष्ट्राच्या महायुती सरकारमधील एक मंत्री गणेश नाईक यांनी येत्या दोन-तीन महिन्यात महाराष्ट्रात भयंकर असे काही घडणार आहे असे भाकीत केले आहे. अर्थात त्यांचे हे भाकीत त्यांचे राजकीय शत्रु एकनाथ शिंदे यांना नजरेसमोर ठेवून त्यांनी केलेले आहे. त्यालाही 500 कोटी रुपयांची ती तथाकथित क्लिप समोर ठेवून त्यांनी हे राजकीय भाकीत केलेले दिसते.उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे राजकीय भाकितांसाठी महाराष्ट्रात सर्वदूर परिचित आहेत. नरेंद्र मोदी हे राजीनामा देणार. राज्यातील सरकार कोसळणार ही त्यांची पूर्वीची काही राजकीय भाकिते सपशेल खोटी ठरून ते तोंडघशी पडले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आप्पाचीवाडी ची भाकणूक, वाशी मधील फरांडे बाबांची भाकणूक
महाराष्ट्रातील सर्वांना माहित आहे. (including) अनेक जण या भाकणुकीचा त्यांना सोयीचा असा अर्थ लावतात आणि ही भाकणूक अर्थात भाकीत खरे ठरले असे सांगत असतात.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही काही महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एफस्टीन फाइल्स प्रकरणी राजीनामा द्यावा लागणार आणि त्यांच्या जागी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार असे भाकीत केले होते. त्यांचेही भाकीत खोटे ठरले. राज ठाकरे किंवा गणेश नाईक यांनी भाकीत करताना त्याचे तपशील मात्र सांगितलेले नाहीत.
हेही वाचा :
सर्वात मोठी बातमी जय पवार थेट सीआयडी कार्यालयात काय आहे प्रकरण
BMC कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, दिवाळीपूर्वी इतके रुपये मिळणार
मनोज जरांगे दारू पितात का काय दिलं उत्तर म्हणाले, मी आत्महत्याच