शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार,आज खात्यात जमा होणार २००० रुपये मेसेज येताच लगेच करा चेक

पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आज जमा होणार
शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधील एका कार्यक्रमातून पैसे वितरीत करतील

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज केंद्र सरकार देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठी भेट देणार आहे. पीएम किसान योजनेचा बहुप्रतिक्षित २४ व्या हप्त्याचे पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. (farmers) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज प्रत्येकी २००० रुपये हस्तांतरित केले जाणार आहेत. दिवाळीपूर्वी पैसे मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पैशामुळे शेतकऱ्यांना दिवाळीत घरखर्चात मदत होणार आहे.

पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खूपच आनंदाचा आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील भिल्डी येथे आयोजित एका कार्यक्रमात देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये २,००० चा २४ वा हप्ता हस्तांतरित करणार आहेत. (farmers) केंद्र सरकार देशभरातील तब्बल ९.३४ कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना २,००० ची आर्थिक मदत मिळणार आहे.

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा ३४ व्या हप्त्याचे पैसे देण्यासाठी १८,६८० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वितरित केली जाणार आहे. पंतप्रधान मोदी बनासकांठा येथे सकाळी १०.३० वाजता एका कार्यक्रमात पीएम- किसान योजनेचा २४ वा हप्ता वितरित करतील. हे पैसे कधी येणार याचे शेतकरी वाट पाहत होते अखेर आज त्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. पीएम किसान योजनेचे २००० शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरीत केले जातील. (farmers) पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी जमा होण्याची नेमकी वेळ बँकिंग प्रक्रियेवर अवलंबून असेल.

हेही वाचा : 

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून राजकारण तापलं, पडळकरांच्या गटातील मतदाराच्या अपहरणाचा आरोप तिघांवर गुन्हा

कांदा खरेदी करताना या चुका टाळा अन्यथा पैशांचं होईल मोठं नुकसान

गुड न्यूज सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर