दिवाळी बाजार जागा निश्चितीवरून इचलकरंजीत विक्रेत्यांमध्ये वादावादी अतिक्रमण विभाग पथक घटनास्थळी दाखल

इचलकरंजीत दिवाळी बाजारावरून विक्रेत्यांमध्ये वाद महापालिकेच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होताच गोंधळ

इचलकरंजी शहरातील श्री शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर दिवाळी बाजार भरवण्यास मनाई करण्याचा निर्णय इचलकरंजी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला होता. (Ichalkaranji) त्यानुसार शुक्रवारी या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होताच विक्रेत्यांमध्ये मतभेद आणि वादावादीचे चित्र पाहायला मिळाले.

दिवाळी बाजारासाठी पर्यायी जागा म्हणून काँग्रेस भवन आणि राणीबाग परिसरात विक्रेत्यांना जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, नेमकी जागा कोणाला द्यायची, (Ichalkaranji) यावरून विक्रेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. काही वेळातच या वादाचे रूपांतर वादावादीत झाले. परिस्थितीची माहिती मिळताच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुभाष आवळे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, काँग्रेस भवन आणि राणीबाग परिसरात दिवाळी बाजार भरवण्यास स्थानिक रहिवाशांकडूनही विरोध होत असल्याचे समोर आले आहे. (Ichalkaranji) त्यामुळे विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था, स्थानिकांचा विरोध आणि महापालिकेच्या निर्णयाची अंमलबजावणी अशा तिहेरी पेचात दिवाळी बाजाराचा प्रश्न अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : 

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून राजकारण तापलं, पडळकरांच्या गटातील मतदाराच्या अपहरणाचा आरोप तिघांवर गुन्हा

कांदा खरेदी करताना या चुका टाळा अन्यथा पैशांचं होईल मोठं नुकसान

गुड न्यूज सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर