जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी मोठा ट्विस्ट महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, नेमकं काय घडलं

नंदूरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं

नंदूरबारमध्ये लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. या जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महायुतीत राजकीय फूट पडण्याची चिन्हे आहेत. नंदूरबारमध्ये भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. (Mahayuti) त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचे तिन्ही घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीमधील या अंतर्गत वादामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

नंदूरबारमध्ये महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. नंदूरबारमध्ये जिल्हा निवडणुकीआधीच राजकीय संघर्षाला सुरूवात झाली आहे. भाजपला सत्ताकाळातील विकासकामांचा विश्वास व्यक्त केला जात आहे. तर शिवसेनेकडून भाजपच्या कामांचा लेखाजोखा मांडण्याची तयारी आहे. दुसरीकडे फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेसही स्वतंत्र ताकद दाखवणार आहे. (Mahayuti) त्यामुळे महायुतीतच राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे. तर विरोधकांपेक्षा मित्रपक्षांचेच आव्हान मोठे असणार आहे. तिन्ही पक्षांची स्वबळाची तयारी आहे. पण किंगमेकर होण्याचाही तिन्ही पक्षांचा दावा आहे. त्यामुळे महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या राजकीय घडामोडीमुळे नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आता महायुतीतील बिघाडीचा फायदा नेमका कोणाला होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या ट्विस्टमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे.

नंदुरबारच्या ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारखानदारांसोबतची बैठक निष्फळ ठरली आहे. नंदूरबार प्रांताधिकारी बंडू कापसे यांच्या उपस्थितीत दर संदर्भात बैठक झाली होती. ऊसाला 3650 शेतकऱ्यांनी दर देण्याची मागणी केली, (Mahayuti) तर कारखानदार काढणे 3250 ते 3305 पर्यंत दर देणार असल्याचं निश्चित केलं. शेतकऱ्यांना पाहिजे, तो दर मिळत नसल्यामुळे एकही ऊस नंदुरबारच्या कारखान्याला देणार नसल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी घेतली. दोन दिवसांत कारखानदारांनी दरासंदर्भात योग्य निर्णय घेतला नाही तर गुजरात राज्यात जाऊन ऊस विक्री करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांना गोड बातमी अखेर आज आणि उद्या 5000 रुपये खात्यात येणार, सरकारची दिवाळी गिफ्ट

दिवाळीच्या एक दिवस आधीच राज ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय, ट्विट करत म्हणाले

निवडणूक हरताच ट्रम्प लाइनवर आले, भारताला दिलासा देणारी मोठी घोषणा