राज्यात नुकतीच पाच विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक झाली. मात्र या निवडणूक निकालावरून महायुतीमध्ये वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून रवींद्र धंगेकर यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे.

राज्यात नुकतीच पाच विधान परिषद जागांसाठी निवडणूक पार पडली, (Elections) ज्यामध्ये नागपूर पदवीधर, मराठवाडा पदवीधर, पुणे पदवीधर आणि शिक्षक तसेच अमरावती शिक्षक मतदारसंघाचा समावेश होता. या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला. महायुतीला दोनच जागा मिळाल्या ज्यामध्ये पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. तर दुसरीकडे तीनही पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. नागपूरची जागा काँग्रेसला मिळाली तर मराठवाडा आणि पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने बाजी मारली. दरम्यान पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. या पराभवासाठी भाजपकडून शिवसेनेला जबाबदार धरण्यात येत आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपकडून स्मिता जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून याच मतदारसंघामधून हर्षदा देशमुख यांना तिकीट देण्यात आलं. या निवडणुकीमध्ये हर्षदा देशमुख या विजयी झाल्या. स्मिता जाधव यांना महायुतीमधील अंतर्गत नाराजीचा फटका बसल्याचं पहयाला मिळालं. (Elections) त्यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी तर स्मिता जाधव यांच्या विरोधात थेट उघड उघड भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं होतं.
दरम्यान आता या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव यांचा पराभव झाल्यानंतर भाजपकडून या पराभवासाठी शिवसेना आणि रवींद्र धंगेकर यांना जबाबदार धरण्यात येत आहे. यावरूनच भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी धंगेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांनी यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला होता. (Elections) त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी देखील आक्रमक भूमिका घेत, बन यांच्यावर हल्लाबोल केला. यावरून वातावरण तापलेलं असताननाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रवींद्र धंगेकर यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे. महायुतीत वितुष्ट येईल अशी विधानं करू नका, असं एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांना म्हटलं आहे. निवडणूक निकालानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.
हेही वाचा :
मारहाण करून एकाचे अपहरण सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
संजय गायकवाड गोत्यात मोठी कारवाई होणार एकनाथ शिंदेंकडून थेट आदेश
अहान शेट्टीच्या ‘सनकी’ या अॅक्शन ड्रामाच्या शूटिंगला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात