महा रॅली विरुद्ध पदयात्रा इंडिया विरुद्ध एन. डी. ए. संघर्ष

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

इंडिया आघाडी आणि एनडीए कडून परस्पर विरोधी दिलेल्या घोषणांनी, आणि केलेल्या आरोप प्रत्यारोपानी नवी दिल्लीचा आसमंत रविवारी दणाणून गेला. काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजपावर मत चोरीचा आरोप केला तर एनडीएच्या नेत्यांनी काँग्रेसला आणीबाणीची, नवी दिल्लीत झालेल्या शीख हत्याकांडाची आठवण करून दिली. काँग्रेसच्या महा रॅलीमुळे राजधानीतील व्यापारी अडचणीत येतील (statements) अशी भीती व्यक्त करणाऱ्या भाजपने सुद्धा महा रॅलीला उत्तर देण्यासाठी पदयात्रा काढून मोर्चाचा माहोल तयार केला होता. नवी दिल्ली पोलिसांनी सावध भूमिका घेतल्यामुळे आणि खबरदारीच्या उपाययोजना केल्यामुळे कुठेही शांततेचा भंग झाला नाही किंवा अनुचित घटना घडली नाही.

“रेजीम चेंज”या शब्द प्रयोगामुळे भारतीय जनता पक्षाकडून टीकेची झोड उठल्यामुळे सावध झालेल्या इंडिया आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शरसंधान केले. राहुल गांधी यांनी तर आम्ही “मोहब्बत की दुकान”उघडले आहे अशी संयत भाषा वापरताना या देशातील सर्व संविधानिक संस्थांवर भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कब्जा मिळवला असल्याचा नेहमीचाच आरोप केला.पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव, बिहारचे तेजस्वी यादव जम्मू काश्मीरच्या मुफ्ती मेहबूबा, वगैरे माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या (statements) राज्यात मत चोरी झाल्यामुळे भाजप प्रणित सरकारे आली असल्याचा
आरोप केला. त्यांनी केलेला हा आरोप काही नवीन नव्हता.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या आक्रमक भाषणात नरेंद्र मोदी, अमित शहा आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर घनाघात केला. मात्र राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात अतिशय संयत भाषा वापरली. मोहब्बत की दुकान हा शब्द प्रयोग त्यातूनच आला असावा. काँग्रेसच्या रविवारच्या महा रॅलीमुळे नवी दिल्लीतील दिवाळी बाजारपेठ अडचणीत येईल अशी भीती गेल्या आठ दिवसांपासून सतत बोलून दाखवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने मग त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत पदयात्रा काढून मोर्चाचा माहोल कशासाठी तयार केला या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित होते. मात्र त्यांनी त्याबद्दलचा खुलासा केला नाही. इंडिया आघाडीने महारॅलीच्या माध्यमातून केवळ भारतीय जनता पक्षाला टार्गेट केले होते तर एनडीए आघाडीकडून केवळ काँग्रेसला धारेवर धरले होते. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर करून भारतीय संविधानाची मोडतोड केली होती. इसवी सन 1984 मध्ये नवी दिल्लीत शिखांचे हत्याकांड केले होते. इंदिराजी गांधी यांनी देशाला फसवून निवडणूक जिंकली होती. अशा काही कटू घटनांचे स्मरण काँग्रेसला करून दिले.

शनिवारी इंडिया आघाडीकडून ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात अभिरूप महा अभियोग चालवला गेला होता. रविवारी ज्ञानेश कुमार हटाव साठी महा रेल्वेचे आणि रामलीला मैदानावर जाहीर सभेचे आयोजन केले होते. आता यानंतर पुढे काय? या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर राहुल गांधी यांच्याकडून दिले गेले नाही मात्र ही लढाई ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेईपर्यंत सुरूच राहील हे सांगण्यास मात्र ते विसरले नाहीत.महाराष्ट्रात ठाणे शहरात महायुतीच्या वतीने काँग्रेस विरोधात लोकतंत्र बचाव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीतील काँग्रेसच्या महा रॅलीवर सडकून टीका केली. नवी दिल्लीत वोट बचाओ देश बचाओ ही घोषणा तर महाराष्ट्रात लोकतंत्र बचाओ ही घोषणा दिली गेली.

फ्रान्स, इटली, स्पेन, आधी देशांमध्ये तेथील लोक प्रस्थापित राजवटीच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत.(statements) या देशात अजूनही असंतोष धुमसत आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील इंडिया आघाडी प्रणित महा रॅलीकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून राहिले होते. तथापि भारताचा द्वेष करणाऱ्या काही शक्तींचा नवी दिल्लीत सर्व काही शांततेत पार पडल्यामुळे चांगलाच भ्रमनिरास झालेला आहे. नवी दिल्लीतील महा रॅलीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे व्यासपीठावर जेन झी चे नेतृत्व करणारे कुणी तरुण नेतृत्व दिसले नाही. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेजीम चेंजची भाषा बोलणारे प्रशांत भूषणही कुठे दिसले नाहीत. सत्ता बदल हा आमचा हेतू नाही किंवा अजेंडा नाही हे सुद्धा या निमित्ताने काँग्रेसने सूचित केले आहे आणि ते त्यांच्यासाठी चांगलेच आहे असे म्हणावे लागेल.

हेही वाचा : 

नोव्हेंबरमध्ये बँका एकूण 17 दिवस बंद असणार, महाराष्ट्रात किती दिवस

लेक लाडकी योजनेच्या नियमात मोठा बदल, आदिती तटकरे यांची मोठी घोषणा, आता थेट

ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी लवकरच संयुक्त बैठक घेणार : पालकमंत्री