वर्गात चालत आली अन् अचानक खाली कोसळली, शिक्षिका उचायला गेल्या अन् 9 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

राजधानी दिल्लीतील एका शाळेतून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. माया विहार परिसरातील लवली हेरिटेज स्कूलमध्ये तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या अवघ्या ९ वर्षीय विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झाला. (incident) प्रगती असे या चिमुरडीचे नाव असून, शाळेत चालत असताना ती अचानक जमिनीवर कोसळली. या घटनेमुळे शाळा प्रशासनासह परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थिनी कोसळल्याची संपूर्ण घटना वर्गातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी प्रगती शाळेत होती. खेळून वर्गात परतल्यानंतर ती चालत असताना अचानक खाली झुकली आणि काही क्षणांतच जमिनीवर कोसळली. हा प्रकार लक्षात येताच शाळेतील कर्मचाऱ्यांनी तिला तातडीने निर्मान विहार येथील मलिक रेडिक्स हेल्थ केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती गुरुवारी सकाळी सुमारे ९ वाजून ५२ मिनिटांनी दिल्ली पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक तपासादरम्यान वर्गातील CCTV फुटेज तपासण्यात आले. (incident) यामध्ये प्रगती अचानक हळूहळू खाली झुकताना आणि त्यानंतर जमिनीवर कोसळताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, विद्यार्थिनीला अचानक कार्डियक अरेस्ट आल्याची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ती स्वतःहून खाली कोसळली होती. घटनेनंतर शाळेने तातडीने तिला रुग्णालयात नेले; मात्र तिचा जीव वाचू शकला नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

या घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. विद्यार्थिनीच्या पालकांचे (incident) तसेच शाळेतील संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात येणार असून CCTV फुटेज आणि अन्य पुराव्यांची तपासणी केली जात आहे. अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांना गोड बातमी अखेर आज आणि उद्या 5000 रुपये खात्यात येणार, सरकारची दिवाळी गिफ्ट

दिवाळीच्या एक दिवस आधीच राज ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय, ट्विट करत म्हणाले

निवडणूक हरताच ट्रम्प लाइनवर आले, भारताला दिलासा देणारी मोठी घोषणा