दिवाळीच्या गोडव्याला महागाईची फोडणी साखरेचे दर क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढले

दिवाळीचा सण जवळ येताच बाजारपेठेत खरेदीची लगबग वाढू लागली आहे. मात्र, यंदा सणाच्या गोडव्यावर महागाईचे सावट पडले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेची मागणी वाढल्याने घाऊक बाजारात दरांनी मोठी उसळी घेतली आहे. (inflation) महिनाभरापूर्वी प्रतिक्विंटल ५ हजार ४०० रुपयांवर असलेली साखर आता ५ हजार ६०० रुपयांवर पोहोचली आहे. अवघ्या महिनाभरात क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ झाल्याने किरकोळ बाजारात ग्राहकांना प्रतिकिलो साखरेसाठी ६० रुपये मोजावे लागत आहेत.

केंद्र सरकारने नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी १३ लाख मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला आहे. असे असले तरी नवीन हंगामातील साखरेची आवक अद्याप अपेक्षेप्रमाणे सुरू झालेली नाही. मागील हंगामाच्या अखेरीस शिल्लक असलेला साठाही तुलनेने कमी असल्याने बाजारात पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दिवाळीच्या काळात मिठाई, फराळ आणि इतर खाद्यपदार्थांच्या निर्मितीसाठी साखरेची मागणी वाढणार असल्याने दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. (inflation) मात्र, ऊसदराच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे अनेक साखर कारखाने अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. परिणामी नवीन साखरेचे उत्पादन आणि बाजारातील आवक मर्यादित राहिली आहे. ऑक्टोबर महिन्यात उत्पादित झालेली साखर नोव्हेंबरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यास परवानगी देण्यात आली असली, तरी त्याचा बाजारभावावर अपेक्षित परिणाम झालेला नाही.

सध्या कारखान्यांकडील निविदांमध्ये साखरेचे दर प्रतिक्विंटल ५ हजार ते ५ हजार १०० रुपयांच्या आसपास आहेत. मात्र, घाऊक बाजारात हेच दर ५ हजार ६०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. वाहतूक, हमाली आणि पॅकिंग यांसारख्या अतिरिक्त खर्चांमुळे किरकोळ बाजारात ग्राहकांना अधिक किंमत मोजावी लागत आहे.

दिवाळीनंतर साखर कारखान्यांचा गाळप वेग वाढेल आणि ऊसतोड कामगारांची उपलब्धता सुधारेल, अशी अपेक्षा आहे. (inflation) त्यामुळे बाजारातील साखरेची आवक वाढून दरांना काहीसा दिलासा मिळू शकतो. मात्र, तोपर्यंत मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी राहिल्यास साखरेचे दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदा दिवाळीचा फराळ तयार करताना सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसणार आहे.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांना गोड बातमी अखेर आज आणि उद्या 5000 रुपये खात्यात येणार, सरकारची दिवाळी गिफ्ट

दिवाळीच्या एक दिवस आधीच राज ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय, ट्विट करत म्हणाले

निवडणूक हरताच ट्रम्प लाइनवर आले, भारताला दिलासा देणारी मोठी घोषणा