एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, बोनस जाहीर, परिवहन मंत्र्यांकडून मोठी घोषणा

मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 83 हजार अधिकारी (employees) व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. एसटी महामंडळाकडून बोनसची घोषणा करण्यात आली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST) 83 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रत्येकी 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान तसेच पात्र कर्मचाऱ्यांना 12500 रुपये सण उचल आणि महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून 60 टक्के करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला आहे. एसटी महामंडळातील विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. महामंडळ आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा आनंद हिरावून घेता येणार नाही, असं यावेळी सरनाईक यांनी म्हटलं आहे.

“एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र मेहनत करून लाखो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सेवा देतात. (employees) त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून दिवाळीच्या सणानिमित्त त्यांना सानुग्रह अनुदान देणे हे केवळ औदार्य नसून त्यांचा हक्क आहे. या निर्णयामुळे महामंडळावर सुमारे 160 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असला, तरी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, हे आमचे आद्य कर्तव्य आहे,” असं यावेळी प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खंबीर पाठबळामुळे एसटी महामंडळाचे भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वासही सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला. (employees) दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन अथवा संपाचे हत्यार उपसू नये, असे आवाहन देखील यावेळी मंत्री सरनाईक यांनी केले. “एसटी ही सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. कोणत्याही आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये. कर्मचारी आणि प्रवासी हे एसटीचे दोन महत्त्वाचे घटक आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवादातून मार्ग काढण्यास आम्ही सदैव तयार आहोत,” असंही ते यावेळी म्हणाले. कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असतानाच प्रवाशांना दर्जेदार सेवा देणे आणि एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, या दोन्ही उद्दिष्टांसाठी शासन आणि महामंडळ कटिबद्ध असल्याचा विश्वासही यावेळी प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान अन्य काही निर्णय आता दिवाळीनंतर घेतले जाणार आहेत.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांना गोड बातमी अखेर आज आणि उद्या 5000 रुपये खात्यात येणार, सरकारची दिवाळी गिफ्ट

दिवाळीच्या एक दिवस आधीच राज ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय, ट्विट करत म्हणाले

निवडणूक हरताच ट्रम्प लाइनवर आले, भारताला दिलासा देणारी मोठी घोषणा