रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषत घेत गंभीर आरोप केले. हेच नाही तर त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले. फडणवीसांचे नाव रोहित पवार यांनी घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला. (Supriya Sule) त्यातच आता सुप्रिया सुळे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.

राज्याचे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात गंभीर आरोप केले जात आहेत. रोहित पवार यांनी काल थेट या प्रकरणात विमान कंपनीच्या मालकाची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे म्हटले. हेच नाही तर मफलरमधील जो फोटो होता, तो फडणवीसांचाच असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. यासोबतच फडणवीस यांचा एक फोटोही त्यांनी शेअर केला. रोहित पवार यांनी थेट फडणवीसांवर आरोप केल्याने भाजपाच्या नेत्यांकडून रोहित पवार यांचा समाचार घेतला जात आहे. रोहित पवार यांच्यावर कडाडून टीका केली जात आहे. (Supriya Sule) त्यातच आता सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, माझी विनंती आहे ज्या लोकांच्या खात्यावर 5 हजार आले नाहीत, अशांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावे. ते तुमच्या हक्काचे पैसे आहेत. याकरिता आम्ही पाठपुरवठा करत आहोत.
फळबागांना टॅंकरची मागणी शरद पवार यांनी केली होती, त्याकरिता पाठपुरवठा करत आहोत. हिंजवडी आणि पुण्यातील वाहतूक कोडींच्या विषयात पुणे महापालिका आयुक्तांकडे मी जाणार आहे. पुण्याच्या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे दिसल्या. (Supriya Sule) यादरम्यान त्यांनी रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर भाष्य करणे टाळले. या मुद्द्या सुप्रिया सुळे नक्की काय बोलणार याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. मात्र, सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील प्रश्नावरच भाष्य केले. रोहित पवार यांच्याकडून ज्या प्रकारे आरोप केले जात आहेत, ज्यानंतर एकच खळबळ उडाली. आता त्यांनी फडणवीस यांचे नाव घेतले. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात सातत्याने रोहित पवार आवाज उठवताना दिसत आहेत. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा काही दिवसांपासून रंगत होती. त्या चर्चांवर स्पष्ट भाष्य करताना सुप्रिया सुळे या दिसल्या होत्या. सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते की, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. पण माझा भाऊ गेला आणि तिथेच चर्चा संपल्या आहेत. तो विषय आमच्यासाठी तिथेच संपलेला आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, मनसेत मोठा पक्षप्रवेश, मुंबईत घडामोडींना वेग