डोळ्यावर पट्टी बांधून १२ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

चंदगड तालुक्यातील एका गावामध्ये १२ वर्षीय चिमुकलीच्या डोळ्यावर पट्टी बांधून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १६) उघडकीस आली. (shocking) याप्रकरणी चिमुकलीच्या आईने चंदगड पोलिसात फिर्याद दिली असून नराधमावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे चंदगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राधिक माहितीनुसार, पीडित चिमुकली ही १२ वर्षे ८ महिन्यांची आहे. नराधम आरोपी हा तिचा नातेवाईक असून रविवारी (दि. १५) या नराधमाने बालिकेला एका प्रोजेक्टच्या कामाचे कारण सांगून आपल्या राहत्या घरी बोलावून घेतले. (shocking) यानंतर तिला खाण्यासाठी सफरचंद दिले आणि संधी साधून तिच्या डोळ्यावर कापडी पट्टी बांधली. डोळ्यावर पट्टी असल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

घाबरलेल्या चिमुकलीने सोमवारी (दि. १६) सकाळी हिंमत करून घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. हा प्रकार ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तात्काळ आपल्या मुलीला घेऊन चंदगड पोलीस ठाणे गाठले आणि घडलेल्या अमानुष कृत्याची सविस्तर फिर्याद दिली.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तात्काळ पावले उचलली असून, (shocking) संशयित आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत हालचाली सुरू होत्या.

हेही वाचा : 

मोठी बातमी शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, मनसेत मोठा पक्षप्रवेश, मुंबईत घडामोडींना वेग

अंबाबाई दर्शनासाठी भाविकांची गर्दी

हुपरीमध्ये आगीत तीन घरे भस्मसात