EPFO बोर्डाने PF खातेधारकांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. (account) त्यातच खातेधारकांसाठी आनंदाची बातमी EPFO बोर्डाने दिली. पीएफ काढण्याचा प्रक्रिया आता सोपी करण्यात आली. सप्टेंबर 2014 पासून लागू असलेल्या EPS-95 योजनेअंतर्गत 1000 रुपयांच्या किमान मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याबाबत चर्चा सुरू आहे.

EPFO बोर्डाने PF खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. अनेक मोठ्या घोषणा त्यांच्याकडून करण्यात आल्या. (account) अनेक नियमात थेट बदल करण्यात आली. पीएफ खात्यातून अगोदर 25 टक्के ठेऊनच रक्कम काढता येत होती. मात्र, आता नवीन नियमानुसार पीएफ खात्यात फक्त 10 टक्के रक्कम ठेऊन उर्वरित रक्कम तुम्ही काढू शकता. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या पीएफ खात्यात जर 1 लाख असतील तर तो व्यक्त 90 हजार रूपये काढू शकतो. पूर्वी असे नव्हेत. 25 टक्के रक्कम पीएफ खात्यात ठेवणे अर्निवार्य होते. यासोबतच EPFO बोर्डाने अनेक गोष्टींमध्ये मोठे बदल केले आहेत. काही प्रकारच्या अंशतः पैसे काढण्यासाठी आवश्यक असलेला किमान वर्गणी कालावधी 12 महिन्यांवरून कमी करून थेट 2 महिने करण्यात आला आहे. अचानक नोकरी गेल्यानंतर कर्मचारी 2 महिन्यातच पीएफ खात्यातून सर्व पैसे काढू शकतो.
पीएफ खातेधारक लग्न, वैद्यकीय उपचार, मुलांचे शिक्षण आणि घराशी संबंधित गरजा यासारख्या कारणांसाठी रक्कम काढू शकतात. बरेच लोक रिटायरनंतर या पैशांचा उपयोग होईल म्हणून या पैशांना अजिबात हात लावत नाहीत. शिवाय या पैशांसाठी मोठ्या प्रमाणात व्याजही मिळते. CITES प्रणालीद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे पात्र दावे साधारणपणे तीन दिवसांत निकाली काढले जातात. मात्र, दाव्यांचा हा जलद निपटारा तुमच्या नोंदी किती अचूक आहेत, यावर अवलंबून असतो. केवायसीशिवाय अनेक गोष्टी यात महत्वाच्या ठरतात. मात्र, पीएफ काढण्याचा प्रक्रिया आता सोपी करण्यात आली. सप्टेंबर 2014 पासून लागू असलेल्या EPS-95 योजनेअंतर्गत 1000 रुपयांच्या किमान मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याबाबत चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असून याबाबत EPFO बोर्डाने कोणतीही घोषणा केली नाही. पण एक अशी चर्चा आहे की, तीन पट्टीने हे वाढवण्याची शक्यता आहे. (account) या नियमात अलीकडेच सुधारणा करण्यात आली असून अनिवार्य पेन्शन योगदानासाठी वेतनाची मर्यादा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. EPFO बोर्डाने अनेक नियमात बदल केला. सोपी प्रक्रिया करण्यावर त्यांनी भर दिला आहे.
हेही वाचा :
दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ
कबनूर येथे दोन घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
थंडीच्या दिवसांत दही खाणे योग्य की अयोग्य आयुर्वेदात नेमकं काय म्हटलं