शरद पवारांचा थेट हसन मुश्रीफांना फोन दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली चर्चांना उधाण

शरद पवारांनी थेट हसन मुश्रीफांना फोन केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याची चर्चां राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. परंतु दोन्ही नेत्यांमध्ये एआय शेतीविषयी चर्चा झाल्याचे समोर आलं आहे.

कोल्हापुरातील गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रयत्न केले होते. गोकुळच्या निवडणुकीमुळे संपूर्ण राज्याचं राजकारण तापलं होतं. परंतु अखेरच्या क्षणी सरकारच्या निर्णयाने डाव फिरला. (political) त्यामुळे गोकुळच्या संस्थेत शासन नियुक्त संचालकांच्या मतांच्या जोरावर महायुतीला अध्यक्षपद मिळालं. या निवडणुकीचं वातावरण शांत झाल्यानंतर शरद पवार यांचं हसन मुश्रीफ यांच्याशी फोनवर संभाषण झाल्याचं समोर आलं आहे. दोन्ही नेत्यांच्या झालेल्या संवादाची संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सध्या हसन मुश्रीफ यांच्या एआय शेतीचं कौतुक होत आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या एआय शेतीचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून कौतुक होत आहे. एआय शेतीद्वारे वाढलेल्या ऊस उत्पादनाची शरद पवार यांनी फोनद्वारे माहिती घेतली आहे. शरद पवार आणि मुश्रीफ यांच्यामध्ये काल सायंकाळी चर्चा झाली. ऊस शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या जागृतीबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. खरंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवल्याची बातमी समोर आली होती. AI तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मंत्री मुश्रीफ यांच्या शेतातील ऊस उत्पादन एकरी 40 टनावरून थेट 90 टनावर पोहोचले. (political) त्यामुळे शरद पवारांनी थेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

ऊस शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य आणि काळाची गरजच बनत चालल्याचे समोर येत आहे. (political) याच एआयमुळे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल तालुक्यातील करनूर येथील फोंड्या माळरानावरील शेतीमध्ये तब्बल एकरी 90 टन ऊस उत्पादन मिळाले आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्यावतीने दोन हजार एकरांमध्ये एआयचा वापर करण्याचा मुश्रीफ यांचा निर्धार आहे. सध्या अडीचशे एकरांवर हा प्रकल्प सुरू आहे. यापूर्वी अनेक प्रयत्नानंतरही एकरी 40 टन उत्पादन मिळवणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी एआयच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जवळपास दुपटीने वाढ होऊन ते 90 टनापर्यंत गेल्याचे समोर आलं आहे.

हेही वाचा : 

दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ

कबनूर येथे दोन घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

थंडीच्या दिवसांत दही खाणे योग्य की अयोग्य आयुर्वेदात नेमकं काय म्हटलं