मैत्रिणीने फसवलं, ३ नराधमांनी दारू पाजून १७ वर्षीय मुलीवर रात्रभर केले अत्याचार

मैत्रीचं नातं अतूट मानलं जात, मात्र याच मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना भाईंदरमध्ये घडली आहे. भाईंदरमध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत नराधमांनी क्रूर कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (minor girl) धक्कादायक म्हणजे पीडित तरुणीला तिच्या मैत्रिणीनेच नराधमांच्या स्वाधीन केल्याची माहिती आहे, या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर येथे काशीगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पीडितेला तिच्याच २५ वर्षीय मैत्रिणीने भेटण्याच्या बहाण्याने बोलवून जबरदस्तीने मद्य पाजले, त्यानंतर दोन तरुणांनी पहाटेपर्यंत पीडितेवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे तर पीडिता बेशुद्ध पडल्यानंतर तिच्या गळ्यातील सोन्याची चैनदेखील लंपास केली.(minor girl) दरम्यान, या घटनेप्रकरणी पीडितेने काशीगाव पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.

१६ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास १७ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीला तिच्या २५ वर्षीय मैत्रिणीने भेटण्याच्या बहाण्याने बोलवले. पीडित तरुणी मैत्रिणीला भेटायला गेली असता यावेळी रात्री ९ ते १२ वाजेच्या सुमारास २५ वर्षीय तरुणी आणि तीन तरुणांनी पीडितेला विनयनगर परिसरातील उच्चभ्रू इमारतीतील एका फ्लॅटमध्ये नेले. तिथे तिला जबरदस्तीने मद्य पाजून तिच्यावर दोन तरुणांनी पहाटे सहा वाजेपर्यंत आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. (minor girl) अत्याचारानंतर पीडिता बेशुद्धावस्थेत असताना तिच्या गळ्यातील सोन्याची चैन देखील लंपास केली.

हेही वाचा : 

दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ

कबनूर येथे दोन घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

थंडीच्या दिवसांत दही खाणे योग्य की अयोग्य आयुर्वेदात नेमकं काय म्हटलं