कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात आज लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. विठ्ठल नामाच्या जयघोषाने अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे.
कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून सुमारे पाच ते सहा लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. पंढरपूर शहराकडे येणारे सर्व रस्ते भाविकांनी व दिंड्यांनी फुलून गेले आहेत. शहरातील मठ-मंदिरांमध्ये विठ्ठल नामाचा जयघोष सुरू आहे. विठ्ठल दर्शनासाठी मंदिरापासून गोपाळपूरपर्यंत दर्शनाची रांग गेली आहे. दर्शन रांगेत जवळपास 50 हजाराहून अधिक भाविक उभे आहेत, तर मुखदर्शनासाठीही भाविकांची एकच गर्दी झाली आहे. (Pandharpur) यावर्षी दुष्काळ असला तरी गर्दी मात्र मोठ्या प्रमाणावर झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दुष्काळाचे संकट दूर करून मुबलक पाऊस-पाणी पडू दे, असे साकडे कार्तिकीसाठी आलेल्या भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणी मातेला घातले आहे.

दरम्यान आज सकाळपासूनच चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे यावर्षी भाविकांच्या स्नानाची सोय व्हावी (Pandharpur) यासाठी नदीपात्रात पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करण्यात आले आहे तसेच नदीपात्रात कोणताही भाविकांना धोका पोहोचू नये यासाठी एनडीआरएफ सह बचाव पथके तैनात करण्यात आलेले आहेत एन डी आर एफ च्या वतीने नदीपत्रात भाविकांना वाचवण्यासाठी रोबोटिक चा वापर करण्यात आला आहे. उद्या पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. महापूजेसाठी आज दुपारी एकनाथ शिंदे पुन्हा पंढरपूरमध्ये येणार आहेत.
कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल मंदिर समितीने दर्शन बारीच्या व्यवस्थेसह भाविकांना अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर विद्युत दिव्यांची रोषणाई कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर रंगीबेरंगी विविध दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आले आहे. दिव्यांच्या रोषणाईने मंदिर व परिसर उधळून निघाला आहे. दिव्यांची रोषणाई विठ्ठल मंदिर पश्चिम द्वार संत नामदेव पायरी संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप संत तुकाराम भवन आदी ठिकाणी दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. (Pandharpur) तसेच यंदा कार्तिकी यात्रेमध्ये प्रथमच विठ्ठल मंदिर ते रेस्ट हाऊस या व्हीआयपी रोडवर देखील दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे.
हेही वाचा :
दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ
कबनूर येथे दोन घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
थंडीच्या दिवसांत दही खाणे योग्य की अयोग्य आयुर्वेदात नेमकं काय म्हटलं