निपाणी, बेळगाव, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती (निपाणी) तर्फे येथील दसरा चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. (Maharashtra)यावेळी ‘निपाणी, बेळगाव, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में’अशा घोषणांनी दसरा चौक दणाणून गेला.

महाराष्ट्र एकीकरण समिती (निपाणी)चे अध्यक्ष जयराम मिरजकर, प्राचार्य डॉ. अच्युत माने, तालुकाध्यक्ष अजित पाटील, लक्ष्मीकांत पाटील, लक्ष्मी पाटील आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनाला खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार के. पी. पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरोज पाटील यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलकांना मार्गदर्शन केले.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्‍यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, सीमाभागातील मराठी भाषिक महाराष्‍ट्रात येण्‍यासाठी गेल्या पाच दशकांहून अधिक काळ लढत आहेत. (Maharashtra) त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आंदोलनात विजय देवणे, बबन रानगे, शशिकांत पाटील, दिलीपकुमार जाधव, दिलीप पवार, बाबुराव कदम, संभाजी जगदाळे, कादर मलबारी, सीमा पाटील, गीता हासूरकर, शाहीर दिलीप सावंत, शंकरराव शेळके, शिवप्रसाद झगडे, विशाल देवकुळे, अजित मोडेकर, हर्षल पाटील आदी सहभागी झाले होते.

कोल्हापूर जिल्हा बार असो.चे अध्यक्ष ॲड. राजेंद्र मंडलिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी ॲड. संपतराव पवार, ॲड. गिरीश खडके, ॲड. बी. आर. पाटील आदी उपस्थित होते. सीमाभागातील मराठी भाषिकांना शासनाचा पाठिंबा आणि त्यांच्या प्रश्नांची दखल घेतली जात असल्याचा संदेश देण्यासाठी निपाणी येथे राज्य मंत्रिमंडळाची स्वतंत्र बैठक घेण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन सीमाप्रश्नाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयातील याचिकेसाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष, खासदार धैर्यशील माने यांनी दिले. आमदार चंद्रदीप नरके यांनीही याप्रश्‍नी कोल्हापुरात बैठक घेण्‍यासाठी पाठपुरावा करण्‍याचे आश्‍वासन दिले.

महाराष्ट्र एकीकरण समिती (निपाणी) तर्फ दसरा चौक येथे आयोजित धरणे आंदोलनाला भेट दिल्यानंतर (Maharashtra) त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही भूमिका मांडली. खा. माने म्हणाले, सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्‍ट्रातील सर्व मंत्रिमंडळ असल्याचा संदेश देण्‍यासाठी निपाणीत मंत्रिमंडळाची बैठक घेतली जाईल. मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्‍यासाठी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृती आराखडा तयार केला आहे. दरम्यान, आमदार चंद्रदीप नरके यांनीही सीमाप्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

हेही वाचा : 

दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ

कबनूर येथे दोन घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

थंडीच्या दिवसांत दही खाणे योग्य की अयोग्य आयुर्वेदात नेमकं काय म्हटलं