पेट्रोलवर 3 रुपये, तर डिझेलवर तब्बल 25 रुपयांचा तोटा 21 नोव्हेंबरचे नवे दर जाहीर

आंतरराष्ट्रीय बाजारात एका बाजूला कच्च्या तेलाच्या किमतीत आज तेजी पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाचा दर वाढून प्रति बॅरल 92.57 डॉलरवर पोहोचला आहे. तर दुसऱ्या बाजूला एका अहवालानुसार सप्टेंबर तिमाहीत तेल कंपन्यांना पेट्रोलच्या विक्रीवर प्रति लिटर 3.1 रुपयांचा तोटा झाला असून डिझेलवर प्रति लिटर 24.5 रुपयांचा तोटा झाला आहे. (Petrol price) त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलचे भाव वाढण्याची चिंता वाढली आहे.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच तिमाहीत पेट्रोल विक्रीतून प्रति लिटर 10.7 रुपयांचा नफा मिळत होता, तर डिझेल विक्रीतून प्रति लिटर 5.6 रुपयांचा नफा मिळत होता. सध्या इंधनाचे दर स्थिर असल्याने ग्राहकांना दिलासा मिळत असला, तरी वाढत्या खर्चामुळे तेल कंपन्यांच्या नफ्यावर दबाव येत आहे. (Petrol price) दरम्यान, 21 नोव्हेंबरचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर झाले असून, दोन्ही इंधनांच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

महाराष्ट्रातील नवे दर :(प्रति लिटर)
मुंबई – पेट्रोल 111.21 रुपये आणि डिझेल 97.83 रुपये
नागपूर – पेट्रोल 111.80 रुपये आणि डिझेल 98.48 रुपये
पुणे – पेट्रोल 112.04 आणि डिझेल 98.68 रुपये
कोल्हापूर – पेट्रोल 112.57 रुपये आणि डिझेल 99.23 रुपये
नाशिक – पेट्रोल 112.44 रुपये आणि डिझेल 99.07 रुपये
ठाणे – पेट्रोल 111.38 रुपये आणि डिझेल 98.00 रुपये
अमरावती – पेट्रोल 112.89 रुपये आणि डिझेल 99.54 रुपये

LPG सिलिंडरवरील वाढता तोटाही तेल कंपन्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अहवालानुसार, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ला ऑक्टोबरमध्ये प्रति सिलिंडर 245 रुपये, तर नोव्हेंबरमध्ये 327 रुपये अंडर-रिकव्हरी होण्याचा अंदाज आहे. सरकारकडून मिळणारी 180 अब्ज रुपयांची रक्कम अद्याप बाकी आहे. (Petrol price) दुसरीकडे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) साठी नोव्हेंबरमध्ये प्रति सिलिंडर सुमारे 309 रुपये, तर डिसेंबरमध्ये हा तोटा 370 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ

कबनूर येथे दोन घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

थंडीच्या दिवसांत दही खाणे योग्य की अयोग्य आयुर्वेदात नेमकं काय म्हटलं