पडीक जमीनीबद्दलच्या विधानाचा विपर्यास, बावनकुळेंचं स्पष्टीकरण म्हणाले, शेतकऱ्यांशी संबंध नाही

राज्यातील पडीक जमिनींबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली आहे. पडीक जमिनी शासनाच्या व्यवस्थापनाखाली घेण्याच्या निर्णयाचा मूळ शेतकऱ्यांशी किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही. (farmers) ज्यांनी शेतकऱ्यांकडून ५० ते १०० एकर जमिनी खरेदी करून त्यावर फार्महाऊस बांधले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जमीन पडीक ठेवली आहे. अशा लोकांसाठी हा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.

सलग तीन वर्षे जमीन पडीक ठेवल्यास ती शासनाच्या व्यवस्थापनाखाली येईल अशी कूळ कायद्यात तरतूद आहे. (farmers) पण माझ्या बोलण्याचा विपर्यास झाला किंवा काही लोकांनी गैरसमज निर्माण केला, असे बावनकुळे म्हणाले. जमीन शासनाच्या वय्वस्थापनाखाली येईल याचा अर्थ सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार ताब्यात घेणार असा होत नाही, असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

कोकण, महाराष्ट्रातील इतर भाग तसेच मराठवाडा आणि विदर्भातील मूळ शेतकरी स्वतः शेती करत असतील तर त्यांच्या जमिनींना या निर्णयाचा कोणताही धोका नाही. शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही असेही बावनकुळे यांनी सांगितले. मात्र काही मोठ्या लोकांनी शेतकऱ्यांकडून ५० ते १०० एकर किंवा त्यापेक्षा अधिक जमीन खरेदी केली आहे. या जमिनींवर फार्महाऊस बांधून त्या शेतीविना पडीक ठेवल्या आहेत. अशा जमिनी शेतीच्या उपयोगात आणणे आवश्यक असल्याचं बावनकुळे म्हणाले.

मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करून ज्यांनी लँड बँक तयार केली आहे त्यांनी पुढील तीन ते पाच वर्षांत या जमिनी शेती उत्पादनासाठी वापराव्यात, अशी सरकारची अपेक्षा आहे. चांगला पाऊस झाल्यानंतर या जमिनी लागवडीखाली आल्यास कृषी उत्पादन वाढेल. (farmers) त्यातून राष्ट्रीय उत्पन्न आणि देशाचा जीडीपी वाढण्यास मदत होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. राज्याला मोठ्या प्रमाणात जमीन पडीक ठेवणे परवडणारे नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

हेही वाचा : 

ऊस दरवाढ आंदोलन पेटलं विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना बंद, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

तरुण तरुणीला घेरलं, दगड, बेल्ट दांडक्याने मारलं, 8 अल्पवयीन मुलांच्या टोळक्याचे कृत्य

पीएफबद्दल मोठी घोषणा, 90 टक्के रक्कम काढता येणार, 8 महत्वाचे नियम, थेट 3 दिवसात