आता विना PIN पेमेंट; या बड्या बँकेचे नवीन बायोमॅट्रिक फीचर

डिजिटल बँकिंग आता अधिक सुरक्षित आणि सुविधाजनक(payments)करण्यासाठी बँकांचा प्रयत्न सुरू आहे. ICICI बँकेने अजून एक पाऊल पुढं टाकलं आहे. मोबाईल बँकिंग ॲप iMobile वर 5,000 रुपयांपर्यंतचा युपीआय व्यवहारासाठी बायोमॅट्रिक ऑथेटिंकेशन सेवा सुरू केली आहे. आता ग्राहकांना छोट्या छोट्या व्यवहारांसाठी UPI पिन लक्षात ठेवण्याची गरज उरली नाही.बँकेनुसार, नवीन सुविधा ॲड्रॉईड आणि iOS या दोन्ही युझर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ॲड्रॉईड युझर्ससाठी त्यांच्या फिंगरप्रिंटचा वापर करू शकतील. तर आयफोन युझर्स हे फेस रिकग्निशन आधारे झटपट व्यवहार करू शकतील. ही सुविधा केवळ 5,000 रुपयांपर्यंतच्या पीअर टू पीअर व्यवहार, क्युआर कोड स्कॅन आणि ऑनलाईन मर्चंट पेमेंट्साठी लागू असेल. पण 5,000 रुपयांपेक्षा अधिक व्यवहारासाठी ग्राहकांना UPI पिन नोंदवणे अनिवार्य आहे.

ICICI बँकेची ही सुविधा बायोमॅट्रिक पेमेंट जलद गतीने करेल आणि ते (payments) सुरक्षितही असेल. सार्वजनिक ठिकाणच्या इंटरनेटचा वापर करून पिन नोंदवणे हे घातक ठरते. NPCI ने ऑक्टोबर 2025 मध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मंजूरी दिली होती. आता बँकेने त्यांच्या प्लॅटफॉर्वर या सुविधेचा वापर सुरू केला आहे. युझर्सला त्यांच्या सुविधेनुसार पिन अथवा बायोमॅट्रिक वापराचा पर्याय उपलब्ध आहे.

आता अनेक बँकांच्या एटीएम केंद्रावर नवीन एटीएम आले आहेत.(payments) या नवीन एटीएम मशीनवर आता क्यूआर कोड स्कॅन आणि युपीआय कोड स्कॅन असे पर्याय दिसत आहेत. तुम्ही वॉलेट अथवा एटीएम कार्ड घरी विसरला असाल तरी तुमचा व्यवहार थांबणार नाही. तुम्हाला एटीएम केंद्रावर रक्कम काढता येईल. मोबाईलमधील तुमच्या फोनपे, गुगल पे अथवा इतर युपीआय ॲपवरून एटीएममधून रक्कम काढता येईल. त्यासाठी मोबाईलमधील संबंधित ॲप ओपन करून एटीएम मशीनवरील क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर एटीएम मशीनवर पुढील प्रक्रिया केल्यानंतर एटीएम मशीनमधून निश्चित केलेली रक्कम काढता येईल.

हेही वाचा

हिंदू तरूणीचे अपहरण, ५ दिवस घरात डांबून ठेवले; ‘लव्ह जिहाद’ने महाराष्ट्र हादरला

 बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! MHT CET परीक्षांच्या तारखा जाहीर

AIमुळे बँकांमध्ये नोकर कपात? जगावर बेरोजगारीचं सावट