कांदा-साखर महागली, डाळी-तांदळाचे भावही वाढले किराणा बाजारातील नवे दर

महागाईचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर स्पष्टपणे दिसायला लागला आहे. रोजच्या जेवणात लागणाऱ्या वस्तूंचे दर वाढल्यामुळे घरखर्च सांभाळणं कठीण होतंय. महत्त्वाचं म्हणजे फक्त सर्वसामान्यच नाही, तर चांगलं उत्पन्न असलेल्या कुटुंबांनाही या महागाईचा फटका बसतोय. कांदा, साखर, तांदूळ, डाळी आणि खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली. (increase) त्यामुळे महिन्याचं बजेट कोलमडलेलं असून किराणा खरेदी करताना ग्राहकांना जास्त पैसे द्यावे लागतायेत.

कांद्याच्या दरात सर्वात जास्त वाढ गेल्या वर्षभरातल्या किराणा वस्तूंच्या किमती पाहिल्या तर कांद्याच्या किंमतीत सर्वात जास्त वाढ झाल्याचं दिसतंय. नोव्हेंबर २०२५ मध्ये कांद्याचा किलोचा भाव २७ रुपये होता. तर आता तो ५४ रुपयांवर पोहोचला आहे. (increase) म्हणजेच कांद्याच्या किंमतीत जवळपास १०० टक्क्यांनी वाढ झाली. साखरेच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ४७ रुपये किलो असलेली साखर आता ६१ रुपयांवर पोहोचली. तर कोथिंबिरीची किंमत ३७ रुपयांवरून ४५ रुपये झाली. तूरडाळीचा भाव ११६ रुपयांवरून १३६ रुपये झाला.

खाद्यतेल आणि तांदळाचे दरही वाढले खाद्यतेलाच्या किमतीतही वाढ झाली आहे. सूर्यफूल तेलाचा दर १६५ रुपयांवरून १९१ रुपये, तर मोहरीच्या तेलाचा दर १८७ रुपयांवरून २१२ रुपये झाला आहे. तांदळाचे दरही ४३ रुपयांवरून ४९ रुपये झाले आहेत. तसेच उडीद डाळ, लाल मिरची, अंडी, तूप आणि दुधाच्या किमतीतही वाढ नोंदवण्यात आली आहे.

बटाटा आणि टोमॅटोच्या दरात दिलासा एकीकडे बऱ्याच वस्तू महागल्या असताना बटाटा आणि टोमॅटोच्या दरात मात्र घट झाली आहे. बटाट्याचा दर २७ रुपयांवरून २३ रुपये, तर टोमॅटोचा दर ४५ रुपयांवरून ३८ रुपये झाला आहे. तर ऑक्टोबर २०२६ मध्ये महागाईचा दर ६.०९ टक्क्यांवर पोहोचला. अन्नधान्य महागाईचा दर ८.९४ टक्के नोंदवण्यात आला. (increase) त्यामुळे आगामी काळात घरखर्चाचं गणित कसं सांभाळायचं, असा प्रश्न सर्वसामान्य कुटुंबांसमोर उभा राहिला आहे.

हेही वाचा : 

इचलकरंजीत पाणी वाया घालवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा, तोटी नसलेली ३१ नळजोडणी खंडित

कृषिमंत्र्यांचा फायन्सास कंपन्यांना मोठा इशारा, थेट मुख्यमंत्रीच

नोकरभरतीचे पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही सरकारने घेतला डेंजर निर्णय, आता थेट