उत्तराखंड सरकारने ‘बैणी-भुली’ नावाची नवीन योजना सुरू केली आहे, (women) ज्यात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 20,000 रुपये दिले जातील. डिसेंबरमध्ये पहिला हप्ता म्हणून 10,000 रुपये थेट बँक खात्यात जमा होतील. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार आणि उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यास मदत करणे आहे.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अनेक योजना आणल्या आहेत. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू आहे. मध्यप्रदेशात लाडली बहना योजना सुरू आहे. (women) आता याच धर्तीवर उत्तराखंड सरकारने बैणी-भुली योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण करण्यात येणार आहे. या नव्या योजनेच्या माध्यमातून महिलांना 20,000 रुपये देण्यात येणार आहे. महिलांच्या बँक खात्यात हे पैसे ट्रान्स्फर होणार आहेत. डिसेंबरमध्ये पहिला हप्ता म्हणून 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. उरलेले 10 हजार दुसऱ्या हप्त्यात दिले जाणार आहेत. या योजनेमुळे राज्यातील 5.23 लाख महिलाना फायदा होणार आहे.
या योजनेचं नाव बैणी-भुली योजना असं दिलं आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षण आणि आत्मनिर्भर करण्यासाठी आणि गावात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या योजनेच्या माध्यमातून महिलांना 20,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे. या योजनेसाठी सरकारने 523 कोटीचं बजेट ठेवलं आहे. पहिल्या टप्प्यात डिसेंबरमध्ये लाभार्थींच्या खात्यात 10 हजार रुपये ट्रान्स्फर केले जाणार आहेत. त्यानंतर 10 हजाराचा दुसरा हप्ता दिला जाणार आहे. प्रत्येक पात्र महिलेला 20 हजाराचा लाभ मिळणार आहे.
या योजनेचा पहिला लाभ ग्रामीण भागातील पात्र महिलांना दिला जाणार आहे. ज्या महिला निकषात बसत असतील आणि बचत गटाशी संबंधित आहेत, (women) त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. राज्याचे ग्रामीण विकास मंत्री भारत सिंह चौधरी यांच्या मते, या योजनेतून ग्रामीण आजीविका मिशन आणि स्वयंरोजगाराशी संबंधित कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना लाभ देण्याचं टार्गेट आम्ही ठेवलं आहे. गावात शेती, पशुपालन, हस्तशिल्प आणि लोकल प्रोडक्ट बनवण्याच्या कामाशी संबंधित महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांना सहकार्य केलं जाणार आहे.
असे मिळणार हप्ते :
या योजनेच्या अंतर्गत महिलांना एकूण 20,000 रुपये दोन हप्त्यात दिले जाणार आहेत.
– पहिला हप्ता : 10,000 रुपये डिसेंबरमध्ये.
– दुसरा हप्ता : 10,000 रुपये
– एकूण मदत : 20,000 रुपये
– एकूण लाभार्थी : 5.23 लाख महिला
हेही वाचा :
इचलकरंजीत पाणी वाया घालवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा, तोटी नसलेली ३१ नळजोडणी खंडित
कृषिमंत्र्यांचा फायन्सास कंपन्यांना मोठा इशारा, थेट मुख्यमंत्रीच
नोकरभरतीचे पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही सरकारने घेतला डेंजर निर्णय, आता थेट