कांद्याच्या दरात मोठी घसरण, शेतकऱ्यांची चिंता वाढली, ऐन दुष्काळात मोठा फटका

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. (onion) गेल्या अवघ्या नऊ दिवसांत कांद्याच्या प्रतिक्विंटल दरात तब्बल १ हजार ७४९ रुपयांची घट झाली आहे.

आधीच दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता बाजारभावातील घसरणीचा दुहेरी फटका बसत आहे.(onion) काही दिवसांपूर्वी चांगला भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता कांद्याचे दर थेट प्रतिक्विंटल चार हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. उत्पादनासाठी केलेला खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बसवणे शेतकऱ्यांसाठी कठीण होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कांद्याच्या दरात घसरण होण्यामागे देशांतर्गत बाजारपेठेतील परिस्थिती महत्त्वाची ठरत आहे. बाजारातील मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा अधिक होत असल्याने दरांवर दबाव निर्माण झाला आहे. (onion) त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याच्या दरावरही परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.सततच्या घसरत्या बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आधीच दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता कांदा विक्रीचा प्रश्न उभा राहिला आहे. कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा : 

इचलकरंजीत पाणी वाया घालवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा, तोटी नसलेली ३१ नळजोडणी खंडित

कृषिमंत्र्यांचा फायन्सास कंपन्यांना मोठा इशारा, थेट मुख्यमंत्रीच

नोकरभरतीचे पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही सरकारने घेतला डेंजर निर्णय, आता थेट