इंडियन प्रिमिअर लीगमध्ये झालेल्या सोमवारच्या सामन्यानंतर एका (match) विचित्र अपघातामध्ये दोन तरुण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी रात्री दिल्लीमधील अशोक विहारमध्ये घडला. या अपघातामध्ये 14 वर्षीय अभव भाटिया आणि त्याचा 20 वर्षीय चुलत भाऊ यज्ञ भाटिया या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. नवी दिल्लीमध्ये सोमवारी, 27 एप्रिल रोजी अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू सामन्यानंतर हा अपघात झाला. या सामन्यानंतर मॅच पाहायला मिळाल्याच्या आनंदात दोघेही घराकडे परत जात असतानाच हा अपघात झाला. रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास हा विचित्र अपघात झाला.

अभवने सामना संपल्यानंतर वडील सुमित भाटिया यांच्याशी फोनवर बोलणं केलं.(match) आपण अर्ध्या तासात घरी पोहचू असं त्याने वडिलांना कळवलं. तो फोनवर बोलत असतानाच अचानक सुमित भाटिया यांना जोरदार धडक दिल्याचा आवाज आला. ते नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी कॉलवरच अभवला आवाज देतो होते. मुलाच्या आवाजाची वाट पाहत असतानाच अन्य एका व्यक्तीने फोन रिसिव्ह करुन तुमच्या मुलांचा अपघात झाल्याचं सांगितलं. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आलं.
नवी दिल्लीमधील हा अपघात दिल्ली पोलीस मुख्यालयापासून अवघ्या काही (match)मीटर अंतरावर घडला. पार्लमेंट स्ट्रीटमधील पीएनबी कॉम्प्लेक्ससमोरील अशोक रोडवर असलेल्या महादेव रोड टी-पॉइंटवर भाटिया बंधूंच्या बाईकला ट्रक धडकली. हे हिट-अँड-रनचे प्रकरण असल्याचा पोलिसांना संशय आहे. ट्रकचा चालक फरार असून त्याचा शोध सुरु असला तरी पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीचा आणि मालवाहू वाहनाचा अपघात झाल्याचा पीसीआर कॉल आला. जेव्हा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले, त्या ठिकाणी त्यांना दोन्ही मुलं रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. दोन्ही तरुणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करुन घेण्यापूर्वीच या दोघांनाही मृत घोषित केले. या दोघांनाही दुचाकी चालवताना हेल्मेट घातले नव्हते, अशी माहिती नवी दिल्ली पोलीस दलाचे डीसीपी सचिन शर्मा यांनी दिली. आज म्हणजेच 30 एप्रिल रोजी अभावचा 15 वा वाढदिवस होता. घरी त्याच्या वाढदिवसाची तयारी सुरु होती आणि त्याचवेळी त्याच्या मृत्यूची बातमी आल्याने सर्वांना धक्का बसला आहे.
भाटिया कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, अभव आणि यज्ञ हे दोघे चुलत भाऊ क्रिकेटचे शौकीन होते. हे दोघेही त्यांच्या पालकांची एकुलती एक मुले होती. बीएससीचे शिक्षण घेत असलेल्या यज्ञाला भविष्यात क्रिकेटपटू व्हायचे होते. सुकामेव्याचे व्यापारी असलेल्या सुमित भाटिया यांनी, “तो यज्ञ एका आयपीएल संघासाठी नेट बॉलर होता,” असेही सांगितले. पोलिसांनी एका प्रत्यक्षदर्शीच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे.चालकाला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
हेही वाचा
हिंदू तरूणीचे अपहरण, ५ दिवस घरात डांबून ठेवले; ‘लव्ह जिहाद’ने महाराष्ट्र हादरला
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! MHT CET परीक्षांच्या तारखा जाहीर