2027 मध्ये नशिबाची साथ आणि राहू-केतूची कृपा लोकांच्या आयुष्यात येणार पैसा, प्रसिद्धी आणि समृद्धी

राहू आणि केतू यांना सामान्यतः अशुभ ग्रह मानले जात असले, तरी त्यांच्या अनुकूल स्थितीमुळे व्यक्तीला धनलाभ, करिअरमध्ये प्रगती आणि यश मिळू शकते, असे ज्योतिषशास्त्र सांगते. (inauspicious) अशात, 2027 मध्ये कोणत्या राशींचं नशीब झळकणार याची देखील उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

राहू आणि केतू यांना सामान्यतः अशुभ ग्रह मानले जात असले, तरी त्यांच्या अनुकूल स्थितीमुळे व्यक्तीला धनलाभ, करिअरमध्ये प्रगती आणि यश मिळू शकते, असे ज्योतिषशास्त्र सांगते. ग्रहांच्या बदलाचे परिणाम 12 राशींवर होत असतात. आता नवीन वर्ष सुरु व्हायला फक्त एक महिना शिल्लक आहे. तर 2027 मध्ये कोणत्या राशींचं नशीब झळकणार याची देखील उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, राहू आणि केतू यांना छाया ग्रह मानले जाते. (inauspicious) इतर ग्रहांप्रमाणे या दोन्ही ग्रहांची स्वतःची राशी नसते. मात्र, शनीनंतर राहू आणि केतू हे सर्वाधिक काळ एका राशीत भ्रमण करणारे ग्रह मानले जातात. हे दोन्ही ग्रह साधारण १८ महिन्यांनंतर राशी परिवर्तन करतात. त्यामुळे त्यांच्या गोचराचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींच्या जीवनावर होत असल्याचे ज्योतिषशास्त्रात मानले जाते.

सध्या राहू कुंभ राशीत, तर केतू सिंह राशीत भ्रमण करत आहेत. हिंदू पंचांगानुसार, ५ डिसेंबर रोजी हे दोन्ही ग्रह राशी परिवर्तन करणार असून, राहू मकर राशीत आणि केतू कर्क राशीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. या गोचरामुळे सहा राशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यवान राशी.

मकर राशी
मकर राशीच्या व्यक्तींसाठी राहू आणि केतूचे हे गोचर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या काळात वैयक्तिक आयुष्यात काही मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. त्यातून प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रातही चांगले यश मिळण्याचे संकेत आहेत. कामातील अडचणी दूर होऊन पुढे जाण्याची संधी मिळू शकते.

मीन राशी
मीन राशीच्या व्यक्तींसाठी हे गोचर आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टीने लाभदायक ठरू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील, तर बऱ्याच काळापासून रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. मित्रांकडून योग्य वेळी मदत मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घेतल्यास आर्थिक लाभ होऊ शकतो.

मेष राशी
मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहू-केतूचे गोचर करिअरच्या दृष्टीने सकारात्मक ठरू शकते. नोकरदारांना आपली क्षमता आणि कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. हाती घेतलेल्या प्रकल्पांमध्ये यश मिळू शकते. (inauspicious) तसेच नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही अनुकूल संधी निर्माण होऊ शकतात.

वृषभ राशी
वृषभ राशीच्या व्यक्तींना करिअर आणि आर्थिक बाबतीत चांगली प्रगती करता येऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचे संकेत आहेत. व्यावसायिकांना नवीन कल्पना आणि योजनांच्या माध्यमातून आर्थिक फायदा होऊ शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून, रखडलेली कामेही मार्गी लागू शकतात. एकूणच, प्रयत्नांना चांगले यश मिळण्याचा हा काळ ठरू शकतो.

मिथुन राशी
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे गोचर भाग्योदय घडवणारे ठरू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळू शकते. परदेशात शिक्षण किंवा नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठीही अनुकूल संधी निर्माण होऊ शकतात. अध्यात्माकडे कल वाढेल. तसेच कामाच्या ठिकाणी अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळाल्याने प्रगतीचा मार्ग सुकर होऊ शकतो.

सिंह राशी
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी राहू आणि केतूचे गोचर आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता असून, उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि कुटुंबीयांची साथ मिळेल. नोकरदारांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांना नवीन ओळखी आणि मैत्रीच्या माध्यमातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या ओळखी भविष्यातही फायदेशीर ठरू शकतात.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गडद

जुगारात हरला कर्जबाजारी झाला अन् दुचाकी चोरल्या