कधीकाळी भारतीय जनता पक्षात असलेले एकनाथ खडसे(leadership development) पक्षातंर्गत राजकारणास कंटाळले होते. जळगाव जिल्ह्यातील भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या वादानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला होता. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांनी प्रवेश दिला होता. त्यानंतर विधान परिषदेवर आमदार केले होते.
आता खडसे पुन्हा भाजपात जात आहे. यामुळे खडसे(leadership development) यांना राष्ट्रवादी पक्षात घेणे, ही आपली मोठी चूक असल्याचे शरद पवार यांनी मान्य केल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले. पुण्यातील बैठकीत शरद पवार यांनी चुकीची कबुली दिल्याचे त्यांनी सांगितले.
माध्यमांशी बोलताना डॉ. सतीश पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला आम्ही विरोध केला होता. त्यांना घेऊन पक्षाच्या काहीच फायदा होणार नाही, हे आम्ही शरद पवार यांना सांगितले होते. तसेच त्यांना आमदारकी देण्याऐवजी पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांना आमदार करावे, असेही म्हटले होते. खडसे बाबत घेतलेला हा निर्णय म्हणजे आपली मोठी चूक होती, हे पवार साहेबांनी आता मान्य केल्याचे सतीश पाटील यांनी सांगितले.
एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्यास आणि विधान परिषदेची उमेदवारी देण्यास जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता. परंतु त्यावेळी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये येताना आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढविण्याचे आश्वासन शरद पवार यांना दिले होते. त्यामुळे त्यांना आमदार करण्यात आले. परंतु त्यांनी राष्ट्रवादी पक्ष वाढला तर नाहीच उलट राष्ट्रवादी पक्षाचे वाटोळे केले.
आता त्यांची सून रक्षा खडसे हिच्या उमेदवारीसाठी त्यांच्या आजारपणाचे खोटे कारण दिले आणि रावेर लोकसभा निवडणूक लढवण्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर आता भाजपात प्रवेश करणार आहे. हा प्रकार म्हणजे एकनाथ खडसे यांची खेळी होती, हे आता उघड झाले आहे, असे सतीश पाटील यांनी म्हटले आहे.
एकनाथ खडसे दिल्लीला का गेले होते. त्यांनी त्या ठिकाणी कोणाच्या भेटी घेतल्या या सर्व बाबी आता समोर आल्या आहेत. एकनाथ खडसे यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक केली आहे, असा चिमटा डॉक्टर सतीश पाटील यांनी घेतला.
हेही वाचा :
एक्सची सेवा ठप्प? भारतासह कित्येक देशांमध्ये आउटेज, यूजर्सच्या तक्रारी
हा दुसरा ऑरीच वाटतोय; आमिर खानच्या मुलाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
वसुलीचा अजब प्रकार, कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी Loan Appने शेअर केले महिलेचे आक्षेपार्ह फोटो