कोल्हापुरात पिस्तुलचा धाक दाखवून दरोडा

कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापुरातील मंगळवार पेठ परिसरात पिस्तुल व गुप्तीचा(police) धाक दाखवून तिघांनी मंगळवार पेठेतील पुण्य पवित्र सोसायटीतील धर्मेद्र केसरीमल ओसवाल यांच्या फ्लॅटवर दरोडा टाकला. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. रोख रक्कम व चांदीचे दागिने हिसकावून नेले. जुना राजवाडा पोलीसांनी रात्री दोन वाजता यातील तिघांना अटक केली.

महादेव उर्फ हणमंत मसगोंडा(police) कुलगुटगी (वय ४७ रा.पाचगाव,ता.करवीर), युनूस हसनसाब मुलतानी (वय २८ रा.शिंदेनगर,निपाणी),धैर्यशिल संभाजी सुतार (वय २५ रा.परिते ता.करवीर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील महादेव हा २०१३ साली झालेल्या एका खुनाची संशयीत आरोपी असून सध्या तो जामीनावर बाहेर आहे.

जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी सांगितले की, चांदीचे व्यापारी धर्मेद्र केसरीमल ओसवाल हे मंगळवारपेठेतील पुण्यपवित्र सोसायटीत फ्लॅट नंबर ४०२ मध्ये राहतात. बुधवारी रात्री नऊ वाजता ते त्यांची पत्नी,दुकानातील कामगार घरात होते. यावेळी संशयीत महादेव कलगुटकी व त्याचे दोघे साथीदार हातात गावठी बनावटीचे पिस्तुल, गुप्ती घेऊन घरात घुसले. त्यांनी ओसवाल व त्यांच्या कामगाराला मारहाण धक्काबुक्की केली.

त्यानंतर ओसवाल यांच्या अंगावर पिस्तुल रोखले तर पत्नील गुप्तीचा धाक दाखवला.ओसवाल यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर देवाऱ्यातील २० ग्रॅम चांदीचे निरंजन असा चार हजार रुपयांचा मुदद्देमाल घेऊन फ्लॅटमधून पलायन केले. ओसवाल यांनी तातडीने जुना राजवाडा पोलीसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ओसवाल यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे महादेव कलगुटकी याच्यासह तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मुदद्देमाल व पिस्तुल,गुप्ती जप्त केली.

हेही वाचा :

राष्ट्रवादीत त्या नेत्याला प्रवेश देणे ही मोठी चूकच… शरद पवारांची कबुली

.एक्सची सेवा ठप्प? भारतासह कित्येक देशांमध्ये आउटेज, यूजर्सच्या तक्रारी

वसुलीचा अजब प्रकार, कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी Loan Appने शेअर केले महिलेचे आक्षेपार्ह फोटो