शिवसेना पक्ष अन् चिन्ह पुन्हा मिळणार? ‘रोखठोक’ मुलाखतीत उद्धव ठाकरेंचे सर्वात मोठे विधान!

लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार(registered symbol) संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक, केंद्र सरकारची दडपशाही तसेच फोडाफोडीच्या राजकारणावर सविस्तर भाष्य केले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेकडे गेलेले धनुष्यबाण चिन्ह अन् शिवसेना पक्षाबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावरुन सर्वात मोठे विधान केले.

“धनुष्यबाण ते मशाल चिन्हबाबत(registered symbol) लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत. पक्षांतरानंतरही अपात्रतेची केस निकाली निघत नाही. निवडणूक आयोगालाही त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? सर्वोच्च न्यायालयानेही पक्ष ठरवण्याचा निर्णय लोकप्रतिनिधींवरुन ठरवु शकत नाही. अद्याप याचा निकाल लागलेला नाही. अजूनही याचा निर्णय आलेला नाही.

“सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल याची खात्री आहे. कारण तसं घटनेच्या परिशिष्ठ १० मध्ये नमूद केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी असताना पंतप्रधान माझ्या शिवसेनेला, जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली. त्याला नकली शिवसेना म्हणत आहेत. याचा अर्थ उघड आहे, निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेही हे चिन्ह अन् पक्ष आपल्याला देऊ नये, यासाठी पंतप्रधान दबाव आणतात की काय? असा प्रश्न पडलेला आहे,” अभी भिती उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

“राजकारणात जन्म देणाऱ्या शिवसेनेच्या कुशीवर तुम्ही वार केलात. तसेच महाराष्ट्राशी गद्दारी केली. नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. महाराष्टातून ४० खासदार निवडून आले होते. महाराष्ट्राने मोदींना भरभरुन दिलं. पण त्यांनी गद्दारी केली. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवले, महाराष्ट्राशी बेईमानी केली, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

हेही वाचा :

मोदी सरकार चले जाव! 17 मे रोजी महाविकास आघाडीची अतिभव्य सभा

नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्यास देशातील लोकशाही संपणार; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘मुख्यमंत्र्यांची अखेरची फडफड, शिंदे, अजित पवारांना एकही जागा मिळणार नाही’, संजय राऊतांचा टोला